धावत्या ट्रकला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST2021-07-21T04:08:17+5:302021-07-21T04:08:17+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : काेळसा वाहतुकीच्या धावत्या ट्रकला अचानक आग लागली. त्यात ट्रकचालक थाेडक्यात बचावला. ही घटना काेंढाळी ...

धावत्या ट्रकला आग
लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : काेळसा वाहतुकीच्या धावत्या ट्रकला अचानक आग लागली. त्यात ट्रकचालक थाेडक्यात बचावला. ही घटना काेंढाळी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील जुनापाणी शिवारात साेमवारी (दि.१९) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यामुळे महामार्गावरील वाहतूक दाेन तास ठप्प झाली हाेती.
नागपूर येथून काेळसा भरून गुजरातकडे जाणाऱ्या जीजे-०९/एव्ही-९३७१ क्रमांकाच्या ट्रकने काेंढाळीनजीकच्या जुनापाणी शिवारात अचानक पेट घेतला. ट्रकच्या केबिनमध्ये आग लागल्याचे दिसून येताच चालक जगदीश प्रशांत खराडे (३४, रा. खैरवाडा, राजस्थान) याने ट्रक थांबवून बाहेर उडी मारल्याने ताे थाेडक्यात बचावला. घटनेची माहिती मिळताच काेंढाळी पाेलीस घटनास्थळी पाेहाेचले. पाेलिसांनी काटाेल नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर तासाभरात आग विझविण्यात आली. यादरम्यान महामार्गावरील वाहतूक सुमारे दाेन तास ठप्प झाली हाेती. याप्रकरणी काेंढाळी पाेलीस तपास करीत आहेत.