शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरी वनासाठी अग्निसुरक्षा आराखडा तयार : सरकारची हायकोर्टाला माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 20:42 IST

अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच, त्याअंतर्गत १२ सदस्यीय संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची एक आठवड्यात बैठक होणार आहे.

ठळक मुद्देसंयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच, त्याअंतर्गत १२ सदस्यीय संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची एक आठवड्यात बैठक होणार आहे.राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली आहे. समितीच्या बैठकीचे इतिवृत्त ७ ऑगस्टपर्यंत न्यायालयात सादर केले जाणार आहे. गेल्या तारखेला न्यायालयाने अंबाझरी वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत अशी विचारणा राज्य सरकारला केली होती. त्यानंतर सरकारने सुरक्षा आराखडा तयार केला.अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरापासून हिंगणा एमआयडीसी व वाडीपर्यंत वन विभागाची सुमारे दोन हजार एकर जमीन आहे. या परिसरात नैसर्गिकरीत्या हजारो झाडे वाढली होती. तसेच, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवड मोहीम सुरू केल्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येत वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, गेल्या मे महिन्यामध्ये मध्यरात्री या वनाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाने रात्री २ वाजता घटनास्थळी पोहचून पहाटे ५ वाजेपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविले, पण तेव्हापर्यंत बराच विलंब झाला होता. दरम्यान,आगीमुळे हजारो झाडे जळून खाक झाली. याविषयी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या. त्यावरून न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेत सरकारला वन संरक्षणाकरिता आवश्यक निर्देश दिले जात आहेत. सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयforestजंगलfireआग