लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास लागलेल्या आगीत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्ह्यांच्या घटनात जप्त करण्याते आलेली १० दुचाकी वाहने आगीत खाक झाली. तसेच परिसरातील डीडीनगर शाळेच्या प्रयोगशाळेचे साहित्य जळून नष्ट झाले.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोतवाली पोलीस स्टेशनच्या मागील बाजूला डीडीनगर शाळा आहे. शाळेच्या प्रयोगशाळेला लागून उभारण्यात आलेल्या टिनाच्या शेडमध्ये पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी वाहने ठेवलेली आहेत. सकाळी शाळा परिसरात कुणीतरी कचरा पेटविला. वाऱ्यामुळे आगीचा कचरा उडून खिडकीतून प्रयोगशाळेतील साहित्याला आग लागली. यात ५० हजारांचे नुकसान झाले. थोड्याच वेळात ही आग इतरत्र पसरली. यात शेडमध्ये ठेवण्यात आलेली दुचाकी वाहने खाक झाली.दूसरी घटना दुपारी १.३० च्या सुमारास सीताबर्डी परिसरातीलनेताजी मार्केट येथे घडली. एका साऊथ इंडियन हॉटेलच्या किचनला आग लागली. परंतु ही आग लगेच आटोक्यात आल्याने अनर्थ टळला.
नागपुरात शाळेच्या प्रयोगशाळेला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:46 IST
शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास लागलेल्या आगीत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्ह्यांच्या घटनात जप्त करण्याते आलेली १० दुचाकी वाहने आगीत खाक झाली. तसेच परिसरातील डीडीनगर शाळेच्या प्रयोगशाळेचे साहित्य जळून नष्ट झाले.
नागपुरात शाळेच्या प्रयोगशाळेला आग
ठळक मुद्देपोलिसांनी जप्त केलेली १० दुचाकी वाहने खाक