बायोडायव्हर्सिटी पार्क परिसरात आग; घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल
By मंगेश व्यवहारे | Updated: March 12, 2024 15:32 IST2024-03-12T15:32:47+5:302024-03-12T15:32:58+5:30
बायोडायव्हर्सिटी पार्क हा भाग जंगलाचा भाग असून, आग पसरत असल्याची माहिती आहे

बायोडायव्हर्सिटी पार्क परिसरात आग; घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल
नागपूर : वाडी एमआयडीसी रोडवरील बायोडायव्हर्सिटी पार्क परिसरातील जंगलाला दुपारी दीड वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. सारिका राऊत यांनी आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन विभागाच्या कंट्रोल रुमला दिली. लगेच नागपूरातून ४ व एमआयडीसीतून १ अग्निशमनचे बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे.
बायोडायव्हर्सिटी पार्क हा भाग जंगलाचा भाग असून, आग पसरत असल्याची माहिती आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सूरू आहे.