सोनपुरी येथे आगीत झोपडी खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:09 IST2021-03-01T04:09:12+5:302021-03-01T04:09:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : अचानकपणे लागलेल्या आगीमुळे झाेपडी खाक झाली. त्यात झाेपडीतील तीन शेळ्यांचा हाेरपळून मृत्यू झाला. ही ...

Fire huts at Sonpuri | सोनपुरी येथे आगीत झोपडी खाक

सोनपुरी येथे आगीत झोपडी खाक

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : अचानकपणे लागलेल्या आगीमुळे झाेपडी खाक झाली. त्यात झाेपडीतील तीन शेळ्यांचा हाेरपळून मृत्यू झाला. ही घटना उमरेड तालुक्यातील साेनपुरी येथे शनिवारी (दि. २७) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

शुल्काबाई तुकाराम मारोडे (७०, रा. साेनुपरी) यांचे वास्तव्य असलेल्या या झोपडीमधील तीन शेळ्यासुद्धा आगीच्या विळख्यात सापडल्या. सदर झोपडीत शुल्काबाई एकट्याच वास्तव्यास असून, यामध्ये त्या थोडक्यात बचावल्या. आगीमध्ये कपडे, अन्नधान्य, रोख रकमेसह सारेच राख झाले. दरम्यान, रविवारी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, या घटनेमुळे ८२,४०० रुपयांचे नुकसान झाले. आगीचे कारण कळू शकले नाही. वृद्ध महिलेस तातडीने मदत देण्याची मागणी राहुल तागडे, मोरेश्वर ठाकरे, प्रेमदास ठाकरे, देवानंद लडी, बळवंता लडी, विलास ठाकरे आदींनी केली आहे.

Web Title: Fire huts at Sonpuri