हॉटेलला आग
By Admin | Updated: October 21, 2014 00:58 IST2014-10-21T00:58:06+5:302014-10-21T00:58:06+5:30
सी.ए. रोडवरील एका हॉटेलमध्ये सिलिंडर लिकेजमुळे आग लागली. या आगीत हॉटेलमधील स्वयंपाक खोली जळून खाक झाली. आगीमुळे सर्वत्र धूर पसरला. कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

हॉटेलला आग
सिलिंडर लिकेज : धुरामुळे कर्मचारी स्वयंपाक खोलीत फसले
नागपूर : सी.ए. रोडवरील एका हॉटेलमध्ये सिलिंडर लिकेजमुळे आग लागली. या आगीत हॉटेलमधील स्वयंपाक खोली जळून खाक झाली. आगीमुळे सर्वत्र धूर पसरला. कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु धुरामुळे ते स्वयंपाक खोलीतच फसले. अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आणि कर्मचाऱ्यांनाही सुखरूप बाहेर काढले.
सी.ए. रोड येथे हरपालसिंह बावेजा यांचे हॉटेल अमिर आहे. येथे दुपारी अचानक आग लागली. पहिल्या माळ्यावरील स्वयंपाक खोलीत सिलिंडर लिकेज असल्याने ही आग लागली. यावेळी स्वयंपाक खोलीमध्ये अनेक सिलिंडर ठेवून होते. उपस्थित कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आणखीनच वाढली. अग्निशमन दलाला लगेच सूचना देण्यात आली. दरम्यान सर्वत्र धूर पसरला. हॉटेलमधून धूर निघत असल्याने बाहेर बघ्यांची गर्दी जमली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी आग आटोक्यात आणली. तसेच स्वयंपाक खोलीत फसलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. दुपारी ३ पर्यंत परिस्थिती आटोक्यात आली. (प्रतिनिधी)