शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पाच मजली कोल्डस्टोअरेजला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:46 IST

भंडारा मार्गावरील कापसी महालगाव परिसरात असलेल्या स्वरूची मसालेच्या पाच मजली                            कोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास आग लागली. कोल्डस्टोअरेजमध्ये हजारो टन मिरचीचा साठा आहे. आगीमुळे मिरचीचा धूर आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने बचाव कामात अग्निशमन विभागाच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दुपारी लागलेली आग रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आलेली नव्हती.

ठळक मुद्देरात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणाचे प्रयत्न: मिरचीच्या धुरामुळे बचावात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा मार्गावरील कापसी महालगाव परिसरात असलेल्या स्वरूची मसालेच्या पाच मजली                            कोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास आग लागली. कोल्डस्टोअरेजमध्ये हजारो टन मिरचीचा साठा आहे. आगीमुळे मिरचीचा धूर आजूबाजूच्या परिसरात पसरल्याने बचाव कामात अग्निशमन विभागाच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दुपारी लागलेली आग रात्री उशिरापर्यंत आटोक्यात आलेली नव्हती.आगीची माहिती मिळाल्यानंतर थोड्याच वेळात अग्शिमन विभागच्या सात गाड्या घटनास्थळी पोहचल्या. यात सिव्हिललाईन मुख्यालय, कळमना, सक्करदरा व कॉटनमार्केट आदी ठिकाणच्या अग्निशमन केंद्रांच्या गाड्यांचा समावेश होता. कोल्ड स्टोअररेजला तीन दरवाजे आहेत. परंतु दोन दरवाजाच्या जागेत मिरचीचे पोते ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एकाच दाराचा वापर शक्य असल्याने कोल्ड स्टोरजमधील आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांना आतमध्ये जाता येत नाही. त्यामुळे एकाच दाराचा वापर करून व इमारतीच्या छतावरील मार्गाचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. स्टोअरेजमध्ये मिरचीचा मोठा साठा आहे. आगीमुळे परिसरात सर्वत्र धूर पसरल्याने नागरिकांच्या डोळ्यांना त्रास होत आहे.कोल्ड स्टोअरेच्या ठिकाणी हायड्रन्ट यंत्रणा सुरू असल्याने आग नियंत्रणासाठी लागणारे पाणी उपलब्ध आहे. अग्निशमन विभागाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी यामुळे मदत झाली. लांबवरून पाणी आणावे लागत नसल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली. पाणी उपलब्ध असल्याने अग्निशमन विभागाचे चार फायर टेंडर परत पाठविण्यात आले. कोल्ड स्टोअरेज सुभाषकुमार जैन यांच्या मालकीचे असून या कोल्डस्टोअरेजला यापूर्वीही आग लागली होती, अशी माहिती अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर