नागपुरात अग्निशमन प्रशिक्षण केंद्र
By Admin | Updated: October 27, 2016 02:35 IST2016-10-27T02:35:59+5:302016-10-27T02:35:59+5:30
राज्याच्या नगरविकास विभागाने नागपूर शहरात विभागीय अग्निशमन प्रशिक्षण कें द्र सुरू करण्याला मंजुरी दिली आहे.

नागपुरात अग्निशमन प्रशिक्षण केंद्र
नगरविकास विभागाची मंजुरी :
७ नोव्हेंबरपासून सुरुवात
नागपूर : राज्याच्या नगरविकास विभागाने नागपूर शहरात विभागीय अग्निशमन प्रशिक्षण कें द्र सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कळमना केंद्रात ७ नोव्हेंबर २०१६ पासून या प्रशिक्षण केंद्र्राच्या कामकाजाला सुरुवात केली जाणार आहे.
नागपूरसह विदर्भातील इच्छुक उमेदवारांना अग्निशमन प्रशिक्षणासाठी मुंबई, पुणे व ठाणे शहरात जावे लागत लागत होते. परंतु आता नागपुरातच प्रशिक्षण केंद्र सुरू होत असल्याने या भागातील उमेदवारांची सुविधा होणार आहे.
कळमना येथील अग्निशमन केंद्राच्या इमारतीत यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. सुरुवातीला येथे ३० विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच ती ५० पर्र्यत वाढविण्यात येईल. येथे प्रशिक्षणार्थींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी बुधवारी दिली. यावेळी अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके उपस्थित होते.
प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी कळमना केंद्रावर सोपविण्यात आली आहे. यासाठी प्राचार्य, प्रशिक्षक व सहायक अशा १० जणांची गरज भासणार आहे. भविष्यात अग्निशमन विभागाच्या नवीन आकृतीबंधानुसार कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तोपर्यंत अग्निशमन विभागाच्या कळमना व इतर केंद्रातील अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविली जाणार आहे.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयांंतर्गत सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे. इयत्ता दहावी उत्तीर्ण व १८ वर्षे वय पूर्ण असलेल्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना खासगी व औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन विभागात भरती करताना प्राधान्य दिले जाते. (प्रतिनिधी)