आग विझवायची आहे थोडा वेळ प्रतीक्षा करा!

By Admin | Updated: July 15, 2015 03:31 IST2015-07-15T03:31:13+5:302015-07-15T03:31:13+5:30

शहरात उभ्या राहात असलेल्या ६० ते ७० मीटर उंचीच्या टोलेजंग इमारतीचा विचार करता महापालिकेच्या अग्निशमन ...

Fire extinguish wait a while! | आग विझवायची आहे थोडा वेळ प्रतीक्षा करा!

आग विझवायची आहे थोडा वेळ प्रतीक्षा करा!

अग्निशमन विभाग हतबल :
१५ मिनिटांनी पोहचतात हायड्रोलिक प्लॅटफॉर्म

राजीव सिंग नागपूर
शहरात उभ्या राहात असलेल्या ६० ते ७० मीटर उंचीच्या टोलेजंग इमारतीचा विचार करता महापालिकेच्या अग्निशमन विभागाला सक्षम करण्याची गरज आहे. परंतु दुर्दैवाने या दृष्टीने क ोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. आग नियंत्रणासाठी वापरण्यात येत असलेली वाहने जुनी झाली आहेत. त्यामुळे आग लागल्यानंतर विभागाकडे मदतीची मागणी केल्यास दोन मिनिटाऐवजी १५ मिनिटांनी हायड्रोलिक प्लॅटफॉर्म घटनास्थळी पोहचत असल्याचे चित्र आहे.
गेल्या दीड दशकात शहरात १५ मीटरहून अधिक उंचीच्या १४२५ इमारतींचे बांधकाम करण्यात आले. यात २५ मीटरहून अधिक उंचीच्या अनेक इमारती आहेत. परंतु मनपाकडे १५ मीटरपर्यंत उंची असलेल्या इमारतीतील आग आटोक्यात आणणारी यंत्रणा आहे. या हायड्रोलिक प्लॅटफॉर्मचे पाच वर्षापूर्वीच आयुष्य संपले आहे. याला २० वर्षे झाली आहेत. परिवहन विभागाच्या नियमानुसार कोणत्याही वाहनाचे आयुष्य १५ वर्षाचे असते. परंतु पर्याय नसल्याने विभागाला या वाहनाचा वापर करावा लागत आहे.
हायड्रोलिक प्लॅटफॉर्मला उभे करण्यासाठी मोकळी जागा लागते. त्याशिवाय आग विझवण्यासाठी याचा वापर करता येत नाही. आग विझवण्यासाठी दोन-तीन मिनिटात प्लॅटफॉर्म अथवा शिडी आगीच्या ठिकाणी पोहचणे अअपेक्षित आहे. परंतु हायड्रोलिक प्लॅटफॉर्म उभे करण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागतात.
अधिकाऱ्यांनी अग्निशमन विभागाला सुसज्ज करण्याची वेळोवेळी मागणी केली. विभागातील पद भरती करण्यासाठी प्रशासनाला वारंवार पत्रे लिहिली.

Web Title: Fire extinguish wait a while!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.