शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  इटर्निटी मॉलमधील कपड्याच्या शोरूमला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:40 IST

सीताबर्डी, व्हेरायटी चौकातील इटर्निटी मॉलच्या समोरील भागातील कपड्याच्या शोरूमला मंगळवारी सकाळी ५.३० वाजता लागलेल्या आगीत वायरिंग पूर्णपणे जळाली असून, कॅश काऊंटर आणि बिलिंग मशीन खाक झाली आहे.

ठळक मुद्दे वायरिंग जळाली : कॅश काऊंटर व बिलिंग मशीन खाक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीताबर्डी, व्हेरायटी चौकातील इटर्निटी मॉलच्या समोरील भागातील कपड्याच्या शोरूमला मंगळवारी सकाळी ५.३० वाजता लागलेल्या आगीत वायरिंग पूर्णपणे जळाली असून, कॅश काऊंटर आणि बिलिंग मशीन खाक झाली आहे.प्राप्त माहितीनुसार, मॉलच्या महाराजबाग रोड भागातील एफबीबी (फॅशन अ‍ॅट किंग) नामक कपड्याच्या शोरूममधून धूर निघताना दिसला. धुरासोबत प्लास्टिक कोटिंगची इलेक्ट्रिक वायरिंग जळाल्याच्या वासामुळे मॉलच्या सुरक्षा रक्षकांचे लक्ष शोरूमकडे गेले. शोरूम कपड्याची असल्यामुळे या शोरूमसह मॉलमधील अन्य शोरूम आगीत सापडण्याची भीती सुरक्षा रक्षकांना वाटली. त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली. आगीमुळे शोरूमचे कॅश काऊंटर, बिलिंग मशीन, इलेक्ट्रिक डिस्प्ले, एलईडी टीव्ही, इलेक्ट्रिक पॅनल बोर्ड आणि केबल जळू लागले. भीषण आग पाहता घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या पोहोचल्या. कर्मचाऱ्यांनी सकाळी ७ वाजता आगीवर नियंत्रण मिळविले. पारस जयस्वाल हे शोरूमचे संचालक असल्याची माहिती आहे.प्रारंभिक तपासणीत आग इलेक्ट्रिक शार्ट सर्किटमुळे लागल्याची अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीत शोरूममधील सामानांसह वायरिंग जळाल्यामुळे सात लाख रुपयांच्या नुकसानीचा दावा करण्यात येत आहे.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर