आगीत कार भस्मसात

By Admin | Updated: January 17, 2017 02:00 IST2017-01-17T02:00:10+5:302017-01-17T02:00:10+5:30

अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील त्रिशरण चौकात उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागल्याने चांगलाच हाहाकार माजला.

Fire the car in the fire | आगीत कार भस्मसात

आगीत कार भस्मसात

एक युवक जखमी : त्रिशरण चौक परिसरातील घटना
नागपूर : अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील त्रिशरण चौकात उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागल्याने चांगलाच हाहाकार माजला. सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात वाहनचालक प्रीतम वानखेडे जखमी झाला आहे.
एमएच-३१ डीके-७४३३ व एमएच३४-एए-९३०५ व आणखी एक चारचाकी वाहन मोकळ्या जागेवर पार्किंग करण्यात आले होते. सकाळी वाहनचालक प्रीतम वानखेडे हे गाडी सुरू करण्यास गाडीत बसले. गाडी सुरू करीत असतानाच गाडीतून धूर निघाला. प्रीतम गाडीच्या बाहेर पडण्यापूर्वी गाडीचे काच फुटून त्याच्या गालावर लागल्याने तो जखमी झाला. तो बाहेर पडल्याबरोबरच गाडी आगीच्या विळख्यात आली.
या आगीच्या विळख्यात आजूबाजूला उभ्या असलेल्या दोन्ही गाड्या आल्या. परंतु नागरिकांच्या समयसूचकतेमुळे दोन्ही कारला तेथून हटविण्यात आले. परंतु एक कार यात पूर्णत: भस्मसात झाली. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर मेश्राम व नागरिकांनी अजनी पोलीस व अग्शिमन विभागाला सूचना केल्या. लोकांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्नही प्रयत्न केला. परंतु आगीचा भडका जास्त असल्याने अग्निशमन विभागाच्या पथकाने अखेर येऊन आग विझविली.
प्राथमिक माहितीनुसार, गाडीत शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज आहे.
जखमी प्रीतमला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Fire the car in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.