शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मेट्रोच्या रिच-३ अ‍ॅक्वा लाईनवर लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 20:42 IST

महामेट्रोच्या रिच-३ अ‍ॅक्वा लाईनवरील लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर वेल्डिंगचे कार्य सुरू होते. दरम्यान अचानक आग पकडली. अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. पण ही मॉक ड्रील होती.

ठळक मुद्देलोकमान्यनगर स्टेशनवर खळबळ : अवघ्या १० मिनिटात मिळविले परिस्थितीवर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या रिच-३ अ‍ॅक्वा लाईनवरील लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर वेल्डिंगचे कार्य सुरू होते. दरम्यान अचानक आग पकडली. यामुळे काही काळ स्टेशनवर खळबळ माजली. अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्टेशनवर उपस्थित पर्यवेक्षकांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. आग आटोक्यात येत नसल्याने त्वरित सेफ्टी सुपरवायझरला माहिती देण्यात आली. नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशामक विभागाशी संपर्क करण्यात आला. विभागाच्या जवानांनी त्वरित अग्निशमन यंत्रणांचा उपयोग करून अवघ्या १० मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. पण ही मॉक ड्रील होती.मेट्रो स्टेशनवर एखादे कार्य सुरू असताना अचानक आग लागल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर आणि आगीवर कसे नियंत्रण कसे मिळवावे, यासाठी महा मेट्रोतर्फे मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. रिच-३ अ‍ॅक्वा लाईनवरील लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनवर राबविण्यात आलेली संपूर्ण मॉक ड्रिल प्रक्रिया अवघ्या १० मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यानंतर मॉक ड्रील अंतर्गत घटनेचा अहवाल भविष्यातील संदर्भासाठी नोंदविला गेला आहे. या मॉक ड्रीलमध्ये महा मेट्रोच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी,कर्मचारी आणि नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होेते.

टॅग्स :Metroमेट्रोfireआग