शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur | फटाक्यांच्या आतषबाजीत जागोजागी आग; एकाच दिवशी १३ आगीच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2022 11:38 IST

फटाक्यांच्या रंगबिरंगी ठीणगीने अनेकांची दिवाळी बेरंग

नागपूर : सोमवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ठिकठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. एकाच दिवशी १३ ठिकाणी आगी लागल्या. यात प्रामुख्याने फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आगी लागल्याची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गणेश पेठ पोलीस स्टेशनसमोरील मंगल सरदा अपार्टमेंट येथे सोमवारी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास आग लागली. कॉटनमार्केट व गंजीपेठ येथील अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या व ही आग आटोक्यात आणली. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कळमना चिखली चौक पेट्राेलपंपासमोर काली माता मंदिरजवळ खाली प्लॉटवर आग लागण्याची दुसरी घटना घडली. कळमना स्टेशनच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

सोमवारी सायंकाळी ७.३०च्या सुमारास वर्धा रोडवरील लोकमत चौकाच्या बाजूच्या इमारतीच्या चौथ्या माळ्यावर आग लागली. कॉटन मार्केट व नरेंद्र नगर अग्निशमन केंद्राच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. रात्री ८.३०च्या सुमारास सिव्हील लाईन येथील नवीन वसाहतीसमोरील खोली क्रमांक १६० गाळ्याजवळ आग लागली. सिव्हील लाईन येथील अग्निशमन विभागाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

तात्या टोपे हॉलच्या मागील बाजूच्या घराला रात्री ९च्या सुमारास आग लागल्याची सूचना नरेंद्र नगर अग्निशमन केंद्राला मिळाली. त्यानुसार जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. जरीपटका भीम चौक येथील बाबा डेकोरेशनला आग लागण्याची घटना रात्री ९.२१ वाजण्याच्या सुमारास घडली. सुगत नगर केंद्राच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

दीनदयाळ नगर, आजी आजोबा पार्कमध्ये रात्री १० च्या सुमारास आग लागल्याची सूचना त्रिमूर्तीनगर स्टेशनला मिळाली. येथील जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

शतावरी चौक रवी सावजी भोजनालयाच्या मीटरमध्ये आग लागल्याची घटना रात्री ११.१०च्या सुमारास घडली. नरेंद्रनगर अग्निशमन केंद्राच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

मनीषनगर कॉटन किंग शाळेजवळ झाडाला रात्री ११.३०च्या सुमालास आग लागली. नरेंद्रनगर केंद्राच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. गरीब नवाब चौक पतंजली दुकानाच्या समोर मेडिकल स्टोअरमध्ये रात्री ११.४५ च्या सुमारास फटाक्यांमुळे आग लागली. सक्करदरा केंद्राच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. गांधीसागर तलावाजवळ रात्री ११.३०च्या सुमारास आग लागली. गणेशपेठ केंद्राच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

दांडेकर यांच्या घराला आग

खरबी रोडवरील शक्तीमातानगर येथील प्रशांत विठ्ठल दांडेकर यांच्या घराला देवघरातील दिव्यामुळे सायंकाळी ६च्या सुमारास लागलेल्या आगीत घरातील संगणक, सोफासेट, टेबल व अन्य साहित्य जळाल्याने ३५ हजारांचे नुकसान झाले. लकडगंज अग्निशमन केंद्राच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

मध्य रेल्वेच्या केबल गोदामाला आग

  • अजनी परिसरातील रेल्वे क्वॉर्टरलगत असलेल्या मध्य रेल्वेच्या सिनिअर सेक्शन, इंजिनिअर, सिग्नल विभागाच्या केबल गोदामाला मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत केबलचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या पाच गाड्यांनी तासभरात ही आग आटोक्यात आणली.
  • केबल गोदामाला आग लागल्याने आगीचे लोळ दूरवरून दिसत होते. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती. बघ्यांची गर्दी जमली होती. अग्निशमन विभागाच्या जवानांनी काही वेळात ही आग आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
टॅग्स :fireआगfire crackerफटाकेnagpurनागपूरDiwaliदिवाळी 2022