बजाजनगर चौकातील इमारतीला आग

By Admin | Updated: March 9, 2017 02:47 IST2017-03-09T02:47:45+5:302017-03-09T02:47:45+5:30

बजाजनगर चौक येथील सन्मान लॉन जवळील एका इमारतीतील फर्निशिंगच्या दुकानाला बुधवारी रात्री अचानक आग लागली.

Fire at the Bajajnagar Chowk building | बजाजनगर चौकातील इमारतीला आग

बजाजनगर चौकातील इमारतीला आग

फर्निशिंगचे दुकान जळून खाक : दीड तासानंतर आग आटोक्यात
नागपूर : बजाजनगर चौक येथील सन्मान लॉन जवळील एका इमारतीतील फर्निशिंगच्या दुकानाला बुधवारी रात्री अचानक आग लागली. ही आग इतकी मोठी होती की अग्निशमन दलाच्या सात गाड्या बोलवाव्या लागल्या. दीड तासानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत दुकान पूर्णत: जळाले आहे.
सन्मान लॉनला लागून प्रयाग इन्क्लेव्ह नावाची चार माळ्याची इमारत आहे. या इमारतीत रितू नहार यांच्या मालकीचे स्क्रिपर फर्निशिंगचे मोठे प्रतिष्ठान आहे. बुधवारी रात्री ११.३० वाजता या दुकानाला अचानक आग लागली.
आग आटोक्यात आणण्यासाठी कॉटन मार्केट, सिव्हील लाईन्स आणि नरेंद्रनगर येथून सात गाड्या बोलावण्यात आल्या. स्टेशन आॅफिसर भीमराव चंदनखेडे यांच्या नेतृत्वात ५० ते ६० जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड तासानंतर आग आटोक्यात आली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या आगीची माहिती होताच या परिसरातील नगरसेवक संदीप जोशी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी लोकांनीही मोठी गदी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Fire at the Bajajnagar Chowk building