शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी कंपनी मालकासह तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:08 IST

धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेची पुरेशी साधने उपलब्ध करून न देता त्यांच्याकडून काम करवून घेणाऱ्या कंपनी मालकासह तिघांवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देगरम कोळसा अंगावर पडला : चार महिन्यांपूर्वीची दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धोक्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षेची पुरेशी साधने उपलब्ध करून न देता त्यांच्याकडून काम करवून घेणाऱ्या कंपनी मालकासह तिघांवर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घनश्याम सारडा, सुरेंद्र सिंग आणि सारसनाथ दुबे अशी या तिघांची नावे आहेत.सारडा यांच्या मालकीची एमआयडीसीत सारडा पॉवर अ‍ॅन्ड स्टील कंपनी आहे. तेथे सुरेंद्र सिंग व्यवस्थापक तर दुबे शिफ्ट इन्चार्ज म्हणून कार्यरत आहे. या कंपनीत धोक्याचे काम असूनही तेथे कामगारांसाठी सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना नसल्याचा पोलिसांचा आरोप आहे. ३ आॅगस्ट २०१७ ला पहाटे ४ च्या सुमारास येथे काम करताना गरम कोळसा अंगावर पडून विजय दामोदर पात्रेकर (वय ३२, रा. पाटणसावंगी) या कामगाराला जबर दुखापत झाली. पाय, पोट, पाठ आणि बराचसा भाग जळाल्याने पात्रेकर गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे २६ सप्टेंबरच्या सकाळी १०.३० च्या सुमारास पात्रेकरचा मृत्यू झाला. त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून प्रकरण चौकशीत घेतले. चार महिन्यांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर या घटनेला कंपनी मालक सारडा, व्यवस्थापक सिंग आणि तेव्हाचा शिफ्ट इन्चार्ज दुबे कारणीभूत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यानुसार, या तिघांवर कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Deathमृत्यूCrimeगुन्हा