प्रवीण तयाल यांच्याविरुद्धचा एफआयआर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:46 IST2021-02-05T04:46:33+5:302021-02-05T04:46:33+5:30
नागपूर : तीन कामगारांच्या मृत्यू प्रकरणात एम्प्रेस मॉलचे मालक प्रवीण रामप्रताप तयाल यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला सदोष मनुष्यवध व अन्य ...

प्रवीण तयाल यांच्याविरुद्धचा एफआयआर रद्द
नागपूर : तीन कामगारांच्या मृत्यू प्रकरणात एम्प्रेस मॉलचे मालक प्रवीण रामप्रताप तयाल यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला सदोष मनुष्यवध व अन्य गुन्ह्यांचा एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रद्द केला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
दीपक गवते, अजय गारोडी व चंद्रशेखर बारापात्रे अशी मृत कामगारांची नावे होती. त्यांना एम्प्रेस मॉल परिसरातील विहिरीच्या खोलीकरणाचे काम देण्यात आले होते. मृत कामगार ७ एप्रिल २०१८ रोजी विहिरीत उतरले असता त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी तयाल व इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. तयाल यांनी स्वत:विरुद्धचा एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज मंजूर झाला. तयालतर्फे अॅड. राहुल कुरेकार यांनी कामकाज पाहिले.