रामटेक येथे ४५ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST2021-03-26T04:09:33+5:302021-03-26T04:09:33+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहे. रामटेक शहरात लग्नानिमित्त कार्यक्रमात ...

Fine of Rs 45,000 recovered at Ramtek | रामटेक येथे ४५ हजारांचा दंड वसूल

रामटेक येथे ४५ हजारांचा दंड वसूल

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहे. रामटेक शहरात लग्नानिमित्त कार्यक्रमात ५० पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती आढळून आल्याने महसूल व पाेलीस पथकाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

उपविभागीय अधिकारी जाेगेंद्र कट्यारे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार बाळासाहेब मस्के, पाेलीस निरीक्षक प्रमाेद मकेश्वर, पाेलीस उपनिरीक्षक प्रमाेद काेळेकर, प्रमाेद राऊत, मंडळ अधिकारी जांभुळे, तलाठी ठाकूर यांच्या नेतृत्वातील पथकाच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

दरम्यान, रामटेक येथील बंडू धमगाये यांच्याकडे लग्नानिमित्त हळदीच्या कार्यक्रमात ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळून येताच, त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१(ब) व भादंवि कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, त्यांच्याकडून १० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत विनापरवानगी डीजे लावल्याप्रकरणी यश जथरे यांच्यावर जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २५ हजार रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला.

परसाेडा (ता. रामटेक) येथील विक्रम रामदास पडाेळे यांच्या घरी स्वागत समारंभ कार्यक्रमात ५० पेक्षा अधिक व्यक्तींची उपस्थिती व विनामास्क आढळून आल्याने त्यांच्यावर १० हजाराचा दंड ठाेठावला. काेराेनाचे वाढते संक्रमण पाहता लग्न व इतर कार्यक्रमात नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा दंडात्मक व फाैजदारी कारवाई केली जाईल, असे तालुका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Web Title: Fine of Rs 45,000 recovered at Ramtek