आर्थिकदृष्ट्या त्रस्त दाम्पत्याची आत्महत्या
By Admin | Updated: October 13, 2016 03:46 IST2016-10-13T03:46:16+5:302016-10-13T03:46:16+5:30
बचत गटातील लोकांचे पैसे परत करण्यास असमर्थ ठरलेल्या एका दाम्पत्याने फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

आर्थिकदृष्ट्या त्रस्त दाम्पत्याची आत्महत्या
फुटाळा तलावात दिला जीव :
बचत गटाचे कर्ज जीवावर बेतले
नागपूर : बचत गटातील लोकांचे पैसे परत करण्यास असमर्थ ठरलेल्या एका दाम्पत्याने फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे घडली. दिनेश हिरामण कूर्यवंशी (५०) आणि त्यांची पत्नी योगिता कूर्यवंशी (४५) अशी मृतांची नावे आहे.
कूर्यवंशी दाम्पत्य सुरेंद्रगड येथील गुप्ता चौकात राहते. त्यांना दोन मुलं अमर आणि अनंता आहेत. अमर अभियंत्रिकीचा विद्यार्थी आहे तर अनंता बारावी उत्तीर्ण आहे. दिनेश गौरखेडे कॉम्प्लेक्सजवळ पानठेला चालवित होते तर योगिता बचत गट चालवायची. योगिता तीन वर्षापासून बचत गटाशी जुळली होती. अनेक महिला तिच्याकडे छोट्या प्रमाणात गुंतवणूक करायच्या. योगिताने ही रक्कम दुसऱ्या लोकांना कर्ज म्हणून दिली होती.
उधारी घेणारे योगिताला पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले. दुसरीकडे बचत गटात गुंतवणूक करणाऱ्यांना दिवाळीत पैसे परत करायचे होते. दिवाळी जवळ येऊ लागल्याने योगिता खूप तणावात होती. तिला दिवाळीपर्यंत २६ लाख रुपये परत करायचे होते. सध्याची परिस्थिती पाहता तिला इतकी मोठी रक्कम परत करणे शक्य नव्हते. यामुळे योगिता व दिनेश खूप तणावात होते.