आगपीडिताला आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:08 IST2021-01-02T04:08:57+5:302021-01-02T04:08:57+5:30

रामटेक : खाेडगाव (ता. रामटेक) येथील रहिवासी दशरथ काेरबा नागाेसे यांच्या घराला लागलेल्या आगीत त्यांच्या घरातील धान्य, राेख रक्कम, ...

Financial assistance to fire victims | आगपीडिताला आर्थिक मदत

आगपीडिताला आर्थिक मदत

रामटेक : खाेडगाव (ता. रामटेक) येथील रहिवासी दशरथ काेरबा नागाेसे यांच्या घराला लागलेल्या आगीत त्यांच्या घरातील धान्य, राेख रक्कम, गृहाेपयाेगी साहित्य, भांडी व इतर वस्तूंची राख झाली. ही घटना २३ डिसेंबर राेजी घडली हाेती. या आगपीडिताला दिलासा मिळावा म्हणून काचूरवाही (ता. रामटेक) ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना आर्थिक मदत देण्यात आली.

त्यांच्या घराला लागलेली आग विझविण्यासाठी स्थानिक तरुणांसह नागरिकांनी मदत केली हाेती. संकटाच्या काळात त्यांना दिलासा मिळावा म्हणून काचूरवाही ग्रामपंचायतने त्यांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला. ग्रामविकास अधिकारी समाधान वानखेडे यांनी पाच हजार रुपयाचा धनादेश दशरथ नागाेसे यांच्या सुपूर्द केला. हा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला. यावेळी नंदू गुरभेले, रामदास मोहनकार, प्रल्हाद साकाेरे, दयाराम मोहनकार, दशरथ बावनकुळे, आदिनाथ टेकाम व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Financial assistance to fire victims