शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांना हवेत आर्थिक, प्रशासकीय अधिकार; महापौर परिषदेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 02:42 IST

उपराजधानीत शनिवारी पार पडलेली सोळावी महाराष्ट्र महापौर परिषद महापौरांच्या अधिकाराच्या मागणीवरून गाजली.

नागपूर : उपराजधानीत शनिवारी पार पडलेली सोळावी महाराष्ट्र महापौर परिषद महापौरांच्या अधिकाराच्या मागणीवरून गाजली. महानगरपालिकांमध्ये महापौरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार मिळावे. त्याचप्रमाणे आयुक्तांच्या हाती सर्व सत्ता देण्याऐवजी अधिकारांचे विकेंद्रीकरण करावे, अशी मागणी राज्यातील महापौरांकडून करण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदामंत्री नितीन गडकरी व्यासपीठावर उपस्थित होते.वनामती येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मुंबईचे महापौर व परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ महाडेश्वर, नागपुरच्या महापौर नंदा जिचकार, संयोजक रणजित चव्हाण उपस्थित होते. मनपा आयुक्तांच्या हाती सर्व सत्ता नको. महापौरांनादेखील आर्थिक व प्रशासकीय अधिकार देण्याची गरज आहे, अशी मागणी विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली. तर महानगरपालिकांना निधीची कमतरता भासत असून राज्य शासनाने मदत करावी, असे नंदा जिचकार म्हणाल्या.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरांचे अधिकार वाढविण्याबाबत गंभीरतेने विचार करू, असे आश्वासन दिले. आम्ही आमच्या बाजूने विचार करुच. मात्र महानगरपालिकांनीदेखील विकास आराखड्याला महत्त्व देण्याची गरज आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयातून काम केले पाहिजे. अन्यथा महानगरपालिकांचा विकास होऊच शकणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.‘मेट्रो’मुळे पर्यावरणाला फायदाचमुंबईत ‘मेट्रो’च्या कारशेडसाठी काही हजार झाडे तोडावी लागणार आहेत. मात्र विद्युतवर चालणाऱ्या ‘मेट्रो’मुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. इतके कार्बन उत्सर्जन करायला मुंबईत किमान तीन कोटी पूर्ण वाढलेली झाडे लावावी लागतील. त्यामुळे ‘मेट्रो’ पर्यावरणपूरक राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Mayorमहापौरnagpurनागपूर