शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भाजपमधील सस्पेन्स दूर, दटके-कोहळे-माने यांना उमेदवारी

By योगेश पांडे | Updated: October 28, 2024 17:04 IST

सावनेरमधून आशीष देशमुख तर काटोलमधून चरणसिंग ठाकूर मैदानात : लढतींचे चित्र जवळपास स्पष्ट

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणूकांसाठी उमेदवारांची बहुप्रतिक्षित यादी जारी झाली असून अखेर मध्य, पश्चिम व उत्तर नागपुरातील सस्पेन्स दूर झाला आहे. भाजपने मध्य नागपुरातून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांचे तिकीट कापून तेथे विधानपरिषद आमदार प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली आहे. तर पश्चिम नागपुरातून ‘सरप्राईज’ देत दक्षिण नागपुरचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांना रिंगणात उतरविले आहे. तर उत्तर नागपुरातून परत एकदा डॉ.मिलींद माने यांनाच संधी मिळाली आहे. याशिवाय सावनेरमधून आशीष देशमुख व काटोलमधून चरणसिंग ठाकूर यांना मैदानात उतरविले आहे. उमरेडमधून भाजपने उमेदवार जाहीर केला नसल्याने सुधीर पारवे यांचे काय होणार व शिंदेसेनेकडून तेथे कुणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

भाजपने पहिल्या टप्प्यात दक्षिण-पश्चिम, पुर्व, दक्षिण, कामठी, हिंगणा येथील उमेदवार जाहीर केले होते. उर्वरित जागांची घोषणा कधी होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मध्य नागपुरात भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. येथे हलबा समाजाचा उमेदवार द्यावा या मागणीने जोर धरला होता. मात्र दटके यांचा ‘पब्लिक कनेक्ट’ व कॉंग्रेसचा तरुण उमेदवार लक्षात घेता भाजपने त्यांच्यावरच विश्वास टाकला. दुसरीकडे पश्चिम नागपुरात माजी महापौर दयाशंकर तिवारी, संदीप जोशी, जयप्रकाश गुप्ता यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. जोशी समर्थक तर रस्त्यावर उतरले होते व हिंदी भाषिकांनी तर आंदोलनदेखील केले. मात्र या मतदारसंघात कुणबी समाजाची लक्षणीय संख्या असल्याने पक्षाने कोहळे यांना संधी दिली. कोहळे २०१४ ते २०१९ या कालावधीत दक्षिण नागपुरचे आमदार होते व मागील निवडणूकीत त्यांना उमेदवारी न देता पक्ष संघटनेचे काम करण्याची सूचना देण्यात आली होती. उत्तर नागपुरात यावेळी भाजपकडून अनेक नावांची चर्चा होती. मात्र माने यांचा अनुभव लक्षात घेता पक्षाने सलग तिसऱ्यांदा त्यांचे नाव या मतदारसंघातून घोषित केले आहे.

सावनेरात केदार, काटोलमध्ये देशमुखांचे आव्हानसावनेर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून कुणाला उमेदवारी जाहीर होते याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत होते. माजी मंत्री सुनिल केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना तेथून कॉंग्रेसने तिकीट दिले आहे. भाजपने तेथून आशीष देशमुख यांना उतरविले आहे. तर काटोलमधून भाजपने राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवार सलिल देशमुख यांच्याविरोधात चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. सलिल यांना वेळ संपल्याने सोमवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे आता काटोलचे दोन्ही प्रमुख उमेदवार एकाच दिवशी अर्ज भरणार आहेत. या दोन्ही मतदारसंघात प्रस्थापितांचे भाजपसमोर आव्हान राहणार आहे.

चर्चांना पूर्णविरामलोकसभा निवडणूकांनंतर काही मतदारसंघात भाजपची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती. त्यामुळे काही आमदारांचा पत्ता कट होतो की काय अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र सोमवारी जाहीर झालेल्या यादीमुळे सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे.

अशा आहेत अकरा मतदारसंघातील प्रमुख लढतीमतदारसंघ                                           महायुती                                                   महाविकासआघाडीनागपूर दक्षिण-पश्चिम                 देवेंद्र फडणवीस (भाजप)                                  प्रफुल्ल गुडधे (कॉंग्रेस)नागपूर मध्य                             प्रवीण दटके (भाजप)                                           बंटी शेळके (कॉंग्रेस)नागपूर पूर्व                             कृष्णा खोपड़े (भाजप)                                  दुनेश्वर पेठे (राष्ट्रवादी-शरद पवार)नागपूर उत्तर                           डॉ. मिलिंद माने (भाजप)                                    नितीन राऊत (कॉंग्रेस)नागपूर दक्षिण                         मोहन मते (भाजप)                                            गिरीश पांडव (कॉंग्रेस)नागपूर पश्चिम                         सुधाकर कोहळे (भाजप)                                    विकास ठाकरे (कॉंग्रेस)हिंगणा                                      समीर मेघे (भाजप)                                       रमेश बंग (राष्ट्रवादी-शरद पवार)सावनेर                                    आशीष देशमुख (भाजप)                                    अनुजा केदार (कॉंग्रेस)रामटेक                             आशीष जयस्वाल (शिवसेना-शिंदे)                  विशाल बरबटे (शिवसेना-उद्धव ठाकरे)कामठी                               चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)                                   सुरेश भोयर (कॉंग्रेस)काटोल                                 चरणसिंग ठाकूर (भाजप)                               सलिल देशमुख (राष्ट्रवादी-शरद पवार)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४katol-acकाटोलsavner-acसावनेरnagpurनागपूरSalil Deshmukhसलिल देशमुख