शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

२८ मेपासून थांबलेला पाऊस अखेर बरसला! विदर्भात हवामानात बदल

By निशांत वानखेडे | Updated: June 24, 2025 20:04 IST

थाेडा उकाडा जाणवताेच : बुधवार, गुरुवारी जाेराचा अंदाज

नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून तीव्रतेने प्रतीक्षा लागून असलेल्या श्रावणाच्या आनंदसरी साेमवारी रात्रीपासून बरसल्या. नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात थांबून थांबून पावसाची रिमझिम चालली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवार, गुरुवारी पावसाचा जाेर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भात यवतमाळ व वाशिम वगळता सर्व जिल्ह्यात साेमवारी रात्रीपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. चंद्रपूर व गडचिराेलीत दमदार सरी बरसल्या. मंगळवार सकाळपर्यंत ३० मि.मी. व गडचिराेलीत १५ मि.मी पावसाची नाेंद झाली. याशिवाय नागपूर, अकाेला, अमरावती, वर्धा, भंडारा या जिल्ह्यात जाेरात नाही पण रात्री रिपरिप सुरू हाेती. नागपूरला मंगळवार सायंकाळपर्यंत १३ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. अकाेल्यातही २४ तासात १९.१ मि.मी. पाऊस झाला आहे. वर्ध्यातही संथपणे रिमझिम चालली आहे.

२ जूनला नवतपा संपल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढत गेली हाेती. मान्सून २८ मे राेजी विदर्भाच्या काठावर पाेहचला खरा पण त्यानंतर पुढे सरकलाच नाही. ढगाळ वातावरण हाेते पण सूर्याचा तापही अधिक हाेता. यामुळे तयार झालेल्या दमट वातावरणाने उकाड्याची तीव्रता आणखी वाढवली. या काळात बहुतेक दिवस तापमान ४० अंशाच्या वरच राहिले. २० जून राेजी नागपूरचे कमाल तापमान ४४ अंशापर्यंत गेले, जे मे महिन्यातही कधी गेले नव्हते. अकाेला, अमरावती तर तापलेच हाेते.

यादरम्यान २० जूनपर्यंत विदर्भात मान्सून पसरल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. गडचिराली व चंद्रपूर जिल्ह्यात चांगला पाऊसही झाला. मात्र इतर जिल्हे काेरडेच हाेते. हवामान विभागाने २४ जूनपासून जाेरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. जाेरदार नसल्याने हळुवार पडलेल्या श्रावणसरी नागरिकांना आणि शेतकऱ्यांनाही दिलासा देणाऱ्या ठरल्या. कारण पेरणीसाठी आणि पेरलेले वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे डाेळे आकाशाकडे लागले हाेते. दिवसा उकाडा थाेडा जाणवत असला तरी त्यात माेठ्या प्रमाणात कमतरता आली आहे. तापमानातही सरासरीपेक्षा माेठी घट झाली आहे.

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसRainपाऊसnagpurनागपूर