शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘तो’ टीसी पोहोचला लोहमार्ग पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:06 IST

नागपूर रेल्वे स्थानकाहून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग करणाऱ्या टीसीने अखेर लोहमार्ग ठाण्यात हजेरी लावली. हजर होण्यापूर्वी या टीसीने अटकपूर्व जामीन मिळविला होता. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या पत्रावरून रेल्वे प्रशासनाने या टीसीवर निलंबनाची कारवाई केली आहे.

ठळक मुद्देरेल्वेने केले निलंबित : अपहरण आणि विनयभंगाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वे स्थानकाहून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग करणाऱ्या टीसीने अखेर लोहमार्ग ठाण्यात हजेरी लावली. हजर होण्यापूर्वी या टीसीने अटकपूर्व जामीन मिळविला होता. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या पत्रावरून रेल्वे प्रशासनाने या टीसीवर निलंबनाची कारवाई केली आहे.अमित बारालिया (२८) रा. शेगाव, जि. अकोला असे त्या टीसीचे नाव आहे. तो मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचारी असून राष्ट्रीय व्हॉलिबॉल खेळाडूही आहे. २१ जानेवारी रोजी त्याने नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर विनातिकीट आढळलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला अजनी येथील रेल्वे क्वॉर्टरमध्ये नेले. तेथे तिचा विनयभंग केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी सोडूनही दिले. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात त्याच्याविरुद्ध भादंविच्या ३५४,३६३,३६६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. आरोपी टीसी जवळपास ५८ दिवस फरार होता. त्यामुळे लोहमार्ग पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली होती. दरम्यानच्या काळात तो कामावर रुजू झाला नाही. दरम्यान टीसीने न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेऊन नागपूर लोहमार्ग ठाण्यात पोहोचला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाशी पत्रव्यवहार केला. लोहमार्ग पोलिसांचे पत्र मिळताच रेल्वे प्रशासनाने संबंधित टीसीवर निलंबनाची कारवाई केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे