अखेर त्या दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:08 IST2021-02-26T04:08:39+5:302021-02-26T04:08:39+5:30

नागपूर : दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात एका महिला शिक्षिकेचा समावेश आहे. निलंबनाची फाईल अनेक दिवस ...

Finally, suspension action was taken against those two teachers | अखेर त्या दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई

अखेर त्या दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई

नागपूर : दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात एका महिला शिक्षिकेचा समावेश आहे. निलंबनाची फाईल अनेक दिवस सामान्य प्रशासन विभागात धूळ खात पडून होती.

दोन्ही शिक्षक एकाच तालुक्यातील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिका गावातील एका विवाहित व्यक्तीसोबत पळून गेली. यामुळे गावात गोंधळ उडाला होता. गावातील राजकीय वातावरणही तापू लागले होते. याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. त्यामुळे शिक्षण विभागाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली. निलंबनाची कारवाई न करण्याप्रकरणी राजकीय दबावाचा वापरही झाल्याची चर्चा शिक्षण विभागात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलंबनाच्या कारवाईच्या प्रस्तावाची फाईल दीड-दोन महिने आधीच सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आली होती. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. सीईओ यांनी प्रलंबित फाईलसंदर्भात तयार करण्यात आलेल्या यंत्रणेमुळे अखेर त्यावर ओकेचा शेरा मारण्यात आल्याची चर्चा आहे. तर शिक्षकाचेही गावातील मुलीशी संबंध होते. याप्रकरणी संबंधित शिक्षकावर गुन्हाही दाखल असल्याची माहिती आहे.

Web Title: Finally, suspension action was taken against those two teachers