शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल : कोट्यवधींचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:12 IST

कोट्यवधींचा भूखंड हडपण्याच्या तयारीने एका व्यक्तीच्या राहत्या घरावर कब्जा करू पाहणाऱ्या दोन बिल्डर तसेच त्यांच्या साथीदारांविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी दरोडा घालण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देदिवसाढवळ्या चालविला बुलडोझर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोट्यवधींचा भूखंड हडपण्याच्या तयारीने एका व्यक्तीच्या राहत्या घरावर कब्जा करू पाहणाऱ्या दोन बिल्डर तसेच त्यांच्या साथीदारांविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी दरोडा घालण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पंकज ज्ञानेश्वर निगोट आणि मिलिंद मधुकर देशमुख अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. हे दोघेही बिल्डर असून गोपालनगरात राहतात. त्रिमूर्तीनगरातील भांगे विहारमध्ये महेंद्र रामदास भांगे (वय ३९) यांचा भूखंड (क्रमांक १८ , १९ आणि २० आर) आहे. त्या भूखंडावर त्यांचे तीन खोल्यांचे घर असून त्यांनी वॉल कंपाऊंडही घातले होते. तेथे सीसीटीव्ही आणि भूखंडाचा मालकी हक्क दर्शविणारा फलक त्यांनी लावला होता. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास आरोपी निगोट आणि देशमुख आपल्या साथीदारांसह भांगे यांच्या भूखंडावर पोहचले. त्यांनी वॉल कंपाऊंडवर चक्क बुलडोजर चालवून ते तोडले. जमीन सपाट करून भूखंडावर मोठमोठे खड्डे खोदून सीसीटीव्ही कॅमेरे, फलक तोडून फेकून दिला. भांगे यांचा मालकी हक्क दर्शविणारा फलक तोडून चोरून नेला आणि भांगे यांच्या घरातील साहित्य बाहेर फेकून दिले. आरोपींनी भांगे यांना धमकी देऊन त्यांच्या भूखंडावर आपल्या नावाचा फलक लावला. तसेचभांगे यांना तेथे येण्यास मज्जाव केला. परत येथे आले तर जीवे ठार मारू, अशी धमकीही आरोपीनी दिली. या संपूर्ण प्रकरणात प्रतापनगर पोलिसांनी कमालीची संशयास्पद भूमीका वठवली. भांगे यांनी तातडीने तक्रार करूनही पोलिसांनी आरोपींना तातडीने आवरण्याऐवजी मुद्दामहून वेळकाढू धोरण अवलंबले.आयुक्तांनी घेतली गंभीर दखलसोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झाल्याने पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्याची गंभीर दखल घेतली. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले. त्यानुसार, उपायुक्त मासाळ यांनी चौकशी करून आरोपी निघोट, देशमुख आणि साथीदारांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. आरोपींना वृत्त लिहिस्तोवर अटक झाली की नाही, ते प्रतापनगर ठाण्यातून स्पष्ट झाले नव्हते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर