अखेर हिवराबाजार धान खरेदी केंद्र सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:16 IST2021-02-06T04:16:00+5:302021-02-06T04:16:00+5:30

रामटेक : रामटेक तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू होऊन दोन महिने झाली. पण हिवराबाजार परिसरातील शेतकऱ्यांचा धान कुणीही घ्यायला ...

Finally, Hivarabazar grain shopping center will be started | अखेर हिवराबाजार धान खरेदी केंद्र सुरू होणार

अखेर हिवराबाजार धान खरेदी केंद्र सुरू होणार

रामटेक : रामटेक तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू होऊन दोन महिने झाली. पण हिवराबाजार परिसरातील शेतकऱ्यांचा धान कुणीही घ्यायला तयार नव्हता. शेतकऱ्यांनी आपला धान घरीच ठेवला होता. याबाबत अनेकांनी पाठपुरावा केला. गुरुवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भातला आदेश जारी केला. आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था हिवराबाजार यांना अटी व शर्थीवर धान खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

धान खरीदी केंद्रावर फक्त शेतकऱ्यांचा धान खरेदी करावा, कोणत्याही परिस्थितीत व्यापाऱ्यांचा माल खरेदी करू नये. उघडण्यावर धान खरेदी करू नये. धान खराब झाल्यास त्याची जवाबदारी संस्थेची राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने जारी करण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत २ नोव्हेंबर २०२० ला शेतकऱ्यांच्यावतीने पालकमंत्री नितिन राऊत यांना काँग्रेसचे उदयसिंग यादव यांनी पत्र देत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. यावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाही करण्यास सांगितले होते. २२ डिसेंबर रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी व प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ, भंडारा यांना याबाबत कार्यवाही करण्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकारी नागपूर गुरुवारी प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ, भंडारा यांना हिवराबाजार येथे धान खरेदी केंद्र सुरू करायचा आदेश काढला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी हिवराबाजार येथे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते.

Web Title: Finally, Hivarabazar grain shopping center will be started