अखेर बुटीबोरी न.प.ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST2020-12-26T04:07:57+5:302020-12-26T04:07:57+5:30
दीर्घकाळाची प्रतीक्षा संपली बुटीबोरी : बुटीबोरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी राजेंद्र चिखलखुंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिखलखुंदे यांची लाखणी ...

अखेर बुटीबोरी न.प.ला
दीर्घकाळाची प्रतीक्षा संपली
बुटीबोरी : बुटीबोरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी राजेंद्र चिखलखुंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिखलखुंदे यांची लाखणी न.प. येथून बुटीबोरी येथे बदली झाली. बुटीबोरी नगर परिषदेची स्थापना १८ एप्रिल २०१८ ला झाली. यानंतर या शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या, ग्रामस्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, आंतरिक रस्ते, अतिक्रमण, बसस्थानकाच्या समस्या सुटतील अशी येथील नागरिकांची अपेक्षा होती. येथील नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी शहराच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासकीय पातळीवर या सर्व कामांचा पाठपुरावा करण्यासाठी न.प.ला पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची होती. यापूर्वी राहुल परिहार यांच्याकडे या न.प. चा प्रभार होता. न.प.चे उत्पन्न वाढवून शहराच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहू, असे प्रतिक्रिया चिखलखुंदे यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.