शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

अखेर नागपुरातील २१ रुग्णालयांची कोविडसाठी सहमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 20:01 IST

कोविड रुग्णालयाच्या कार्यान्वयासंबंधी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीद्वारे ६३ रुग्णालयांची सुनावणी सुरू आहे. गेल्या शनिवारी सुनावणीला अनुपस्थित हॉस्पिटल्सना नोटीस पाठवून पुन्हा एकदा सुनावणीची संधी देण्यात आली होती. अखेर २१ रुग्णालयांचे डॉक्टर, प्रतिनिधींनी सोमवारी उपस्थित राहून बहुतांश रुग्णालयांनी कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यास सहमती दर्शविली व याबाबतचे पत्र हॉस्पिटलद्वारे सादर करण्यात आले.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड रुग्णालयाच्या कार्यान्वयासंबंधी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीद्वारे ६३ रुग्णालयांची सुनावणी सुरू आहे. गेल्या शनिवारी सुनावणीला अनुपस्थित हॉस्पिटल्सना नोटीस पाठवून पुन्हा एकदा सुनावणीची संधी देण्यात आली होती. अखेर २१ रुग्णालयांचे डॉक्टर, प्रतिनिधींनी सोमवारी उपस्थित राहून बहुतांश रुग्णालयांनी कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यास सहमती दर्शविली व याबाबतचे पत्र हॉस्पिटलद्वारे सादर करण्यात आले.कोविड रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. मात्र यापैकी केवळ ३९ रुग्णालये पूर्णत: कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित आहेत. अन्य रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली आहे.सुनावणी प्रसंगी समितीचे अध्यक्ष महापौर संदीप जोशी, मनपा आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अनिल लद्धड व समितीचे सचिव, मनपा प्रभारी उपायुक्त मिलिंद मेश्राम आदी उपस्थित होते.कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यासंदर्भात खासगी रुग्णालयांच्या काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी समितीसमोर शनिवारी ६३ रुग्णालयांच्या प्रशासन आणि डॉक्टरांना बोलविण्यात आले होते. मात्र यापैकी ३५ रुग्णालयांचेच प्रतिनिधी उपस्थित असल्याने रुग्णालयांच्या अनुपस्थितीवर समितीने नाराजी वर्तविली होती.सोमवारी सर्व रुग्णालयांनी उपस्थिती नोंदविली व समितीपुढे आपल्या अडचणी मांडल्या. यापैकी बहुतांश रुग्णालयांनी यासाठी सहमती दर्शविली.लेखी स्वरूपात हमीखासगी रुग्णालयात उपलब्ध बेड्सच्या संख्येनुसार त्यापैकी व्हेटिंलेटर, आयसीयू आणि आॅक्सिजनची सुविधा या सर्वांची सविस्तर माहिती समितीपुढे सादर करून यामधून ठराविक बेड्स कोविडसाठी उपलब्ध करून देण्याची हमी लेखी स्वरूपात समितीपुढे देण्यात आली आहे. रुग्णालयांनी सामंजस्याची भूमिका घेऊन शहरासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संदीप जोशी यांनी केले. सर्व रुग्णालयांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाकडे समितीचा सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या