‘पैंजनिया बोल’ची अंतिम फेरी रविवारी
By Admin | Updated: November 7, 2014 00:43 IST2014-11-07T00:43:42+5:302014-11-07T00:43:42+5:30
क्लासिकल, सेमिक्लासिकल आणि फोक डान्सच्या विविध प्रकारातील स्पर्धेची प्राथमिक फेरी बाल आणि युवकांच्या कलाविष्काराने रंगली. ‘पैंजनिया बोल’ या शीर्षकाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेला

‘पैंजनिया बोल’ची अंतिम फेरी रविवारी
लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट व हार्मोनी इव्हेंटस् प्रस्तुत
नागपूर : क्लासिकल, सेमिक्लासिकल आणि फोक डान्सच्या विविध प्रकारातील स्पर्धेची प्राथमिक फेरी बाल आणि युवकांच्या कलाविष्काराने रंगली. ‘पैंजनिया बोल’ या शीर्षकाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेला कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता सर्वांची नजर अंतिम फेरीकडे लागली आहे. अंतिम फेरी रविवारी, दि. ९ नोव्हेंबरला सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर, आठ रस्ता चौक येथे सकाळी १० वाजता सुरू होईल.
अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांची नावे :
वयोगट - ६ ते १४ वर्षे
क्लासिकल गट - जान्हवी हेलवटकर, समीक्षा सहारे, मैत्री इंगळे, वैष्णवी गाडगे, अनिषा जाचक.
सेमिक्लासिकल गट - प्रविणा गोतमारे, राशी कवणे, पृथा राऊत, अर्जुन नायर, उत्सव पटेल.
फोक डान्स - तनुश्री ढोबळे, जानवी सोमकुंवर, साची गुंडावार, श्रेया तायवाडे, दिशा मोरारकर, फाल्गुनी भानारकर, आरोही दामाडकर.
वयोगट : १५ ते ३०
क्लासिकल गट - मानसी शर्मा, स्नेहा निनावे, रोशन डोंगरदिवे, रिना बनकर.
सेमी आणि फोक डान्स - अपूर्वा काकडे, रश्मी देशमुख, साक्षी आकरे, रश्मी शेटे, सिद्धी सुरोसे सांगवी.
युगल (दोन्ही गटाकरिता) - पृथा राऊत व संस्कृती, अतिथी आणि रिया, सिंगम, रुचिका रेवतकर आणि रुधानी मस्के, तन्मयी सिंकदर आणि नेहा बांगडे, चैतन्य व जान्हवी हेलवटकर
ग्रुप डान्स (दोन्ही गट) - युथ कला निकेतन, अक्षय नृत्यसम्राट, कुर्वेज मॉर्डन पब्लिक स्कूल, निर्भय ग्रुप, केएसपीएस ग्रुप.
अधिक माहितीकरिता लोकमत कॅम्पस क्लब, लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ, नागपूर येथे ९९२२९१५०३५, ९८२२४०६५६२, ९८२३४६४०८० या क्रमांकावर संपर्क साधावा.