प्रस्तावाला अंतिम मंजुरी लवकरच

By Admin | Updated: February 12, 2015 02:10 IST2015-02-12T02:10:12+5:302015-02-12T02:10:12+5:30

अमरजित सिंग यांनी सांगितले की, मिहानमधील जागा आयआयएमसाठी सर्वोत्तम आहे. १५ ते ३० मार्चदरम्यान केंद्र सरकारला जागेसंदर्भात अहवाल पाठविण्यात येणार आहे.

Final approval for the proposal soon | प्रस्तावाला अंतिम मंजुरी लवकरच

प्रस्तावाला अंतिम मंजुरी लवकरच

१४ वे आयआयएम मिहानमध्ये
नागपूर : अमरजित सिंग यांनी सांगितले की, मिहानमधील जागा आयआयएमसाठी सर्वोत्तम आहे. १५ ते ३० मार्चदरम्यान केंद्र सरकारला जागेसंदर्भात अहवाल पाठविण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पात आर्थिक तरतुदींनंतर निधीच्या उपयोगासाठी परवान्याची आवश्यकता असते. त्यानंतर प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळेल. नागपूर आयआयएम अहमदाबादच्या आयआयएमशी संलग्न राहील. प्रारंभी व्हीएनआयटीच्या इमारतीत संस्थेचे कार्यालय असणार आहे.
अहमदाबादच्या धर्तीवर उभारणी
मिहानमध्ये जागेचे निरीक्षण केल्यानंतर आयआयएम, अहमदाबादचे संचालक प्रा. आशिष नंदा यांनी सांगितले की, मिहानमधील आयआयएम अहमदाबादच्या धर्तीवर राहील.
सर्वस्तरावर विशेष लक्ष देण्यात येईल. मिहानमधील आधुनिक पायाभूत सुविधा सर्वोत्तम आहे. यापूर्वी आयआयएम चमूने दक्षिण भारतात दोन शहरातील जागेची पाहणी केली आहे. त्यातुलनेत मिहानमधील जागा उत्तम आहे.
पाहणीदरम्यान एमएडीसीचे मुख्य अभियंता सुभाष चहांदे, अधीक्षक अभियंता समरेश चॅटर्जी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अशोक चौधरी, विपणन व्यवस्थापक अतुल ठाकरे, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दहेगाव येथे आहे जमीन
मिहानमधील प्रस्तावित आयआयएम दहेगाव येथे नॉन एसईझेड भागात असणार आहे. सुमारे २०० एकर जागा वर्धा रोडपासून तीन कि़मी. आणि मिहानच्या उड्डाण पुलापासून एक कि़मी. अंतरावर आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आयआयएमची उभारणी केंद्रीय बांधकाम विभाग करणार आहे.

Web Title: Final approval for the proposal soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.