इसापूर येथील पाेलीस पाटलाचे रिक्त पद भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:29+5:302021-03-04T04:12:29+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पिपळा (डाकबंगला) : सावनेर तालुक्यातील खापरखेडा पाेलीस ठाण्यांतर्गत असलेल्या इसापूर येथील पाेलीस पाटलाचे पद गेल्या आठ ...

इसापूर येथील पाेलीस पाटलाचे रिक्त पद भरा
लाेकमत न्यूज नेटवर्क
पिपळा (डाकबंगला) : सावनेर तालुक्यातील खापरखेडा पाेलीस ठाण्यांतर्गत असलेल्या इसापूर येथील पाेलीस पाटलाचे पद गेल्या आठ वर्षांपासून रिक्त आहे. या रिक्त पदासाठी प्रशासनाने भरती प्रक्रिया राबवून पाेलीस पाटलाची नियुक्ती करावी, या मागणीसाठी माजी सरपंच नारायण ठाकरे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन साेपविले आहे.
इसापूर येथे २०१३ ला अशाेक वामन ठाकरे हे पाेलीस पाटील पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर चार वर्षांनंतर सावनेर उपविभागामार्फत रिक्त पाेलीस पाटील पदाकरिता आरक्षण साेडत काढण्यात आली हाेती. त्यात इसापूर गावासाठी पाेलीस पाटलाचे पद हे विमुक्त भटक्या जातीकरिता आरक्षित करण्यात आले. परंतु सदर प्रवर्गातील नागरिक नसल्याने इसापूर गावातून कुणीही अर्ज केला नाही. परिणामी येथील पाेलीस पाटील पदाची नियुक्ती झाली नाही. तेव्हापासून आजतागायत हे पद रिक्त असल्याने गावात कायदा व सुव्यवस्था राखणे कठीण हाेत असून, गावकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे इसापूर येथील पाेलीस पाटील पदासाठी सुधारित आरक्षण साेडत काढून, भरती प्रक्रिया राबवीत हे पद भरण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी माजी सरपंच नारायण ठाकरे, ग्रा.पं. सदस्य सम्राट गजभिये, जयंत साेमकुवर, पवन गाेंडुळे, किशाेर ठाकरे आदींसह गावकरी उपस्थित हाेते.