गुगल लँड डेव्हलपर्सच्या संचालकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST2021-06-20T04:06:57+5:302021-06-20T04:06:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - भूखंडाचा साैदा करून १४ लाख, २१ हजार रुपये घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला एका टोळक्याने दुसऱ्याच्या ...

Filed a lawsuit against the director of Google Land Developers | गुगल लँड डेव्हलपर्सच्या संचालकांवर गुन्हा दाखल

गुगल लँड डेव्हलपर्सच्या संचालकांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - भूखंडाचा साैदा करून १४ लाख, २१ हजार रुपये घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला एका टोळक्याने दुसऱ्याच्या मालकीचा भूखंड विकला. त्याचे बनावट कब्जापत्रही दिले. चार वर्षांपूर्वी झालेल्या या बनवाबनवीचा भांडाफोड झाल्यानंतर जरीपटका पोलिसांनी शुक्रवारी गुगल लँड डेव्हलपर्सच्या संचालकासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

रवी किशोर बोरकर (वय ३३, रा. नारी), प्रतीक अरविंद बंबाले (३३, रा. नालंदानगर, नारी) आणि कमलेश अशोक उईके (२८, रा. कामगारनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

कृष्णकुमार गंगाप्रसाद तिवारी (४४) हे हुडको कॉलनीत राहतात. त्यांच्यासोबत आरोपी बोरकर, बंबाले आणि उईके यांनी एका भूखंड विक्रीचा साैदा केला. त्यांना माैजा नारा येथील दुसऱ्याच एकाची जागा दाखविली आणि ती आमचीच आहे, असे सांगून त्या भूखंडाचे बनावट कब्जापत्र करून दिले. त्या बदल्यात १४ लाख २१,३७५ रुपये घेतले. जरीपटक्याच्या भीम चाैकातील गुगल लँड डेव्हलपर्सच्या कार्यालयात १४ सप्टेंबर २०१७ ला हा व्यवहार पार पडला. दरम्यान, रक्कम घेताना महिनाभरात भूखंडाचे विक्रीपत्र करून देण्याची थाप मारणारे आरोपी नंतर मात्र टाळाटाळ करू लागले. संशय आल्याने तिवारी यांनी चौकशी केली असता आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यामुळे तिवारी यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी चाैकशी करून या प्रकरणात शुक्रवारी (दि. १८) उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांची चाैकशी सुरू आहे.

Web Title: Filed a lawsuit against the director of Google Land Developers