रिसाॅर्ट मालकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:59+5:302021-03-04T04:11:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : पाेलिसांनी वाकी (ता. सावनेर) शिवारातील एका रिसाॅर्टवर साेमवारी (दि. १) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ...

रिसाॅर्ट मालकावर गुन्हा दाखल
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : पाेलिसांनी वाकी (ता. सावनेर) शिवारातील एका रिसाॅर्टवर साेमवारी (दि. १) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास धाड टाकली. तिथे काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन केले जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी रिसाॅर्टच्या मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७ मार्चपर्यंत काही बाबींवर बंदी घातली असून, घराबाहेर पडताना मास्क वापरणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य केले आहे. त्यातच गर्दी करणे किंवा गर्दीत जाणे टाळण्याचे तसेच याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कावाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने वाकी शिवारातील द्वारका पार्क रिसाॅर्टमध्ये काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन केले जात असल्याची माहिती खापा पाेलिसांना मिळाली हाेती.
परिणामी, पाेलिसांच्या पथकाने साेमवारी सायंकाळी या रिसाॅर्टची पाहणी केली. तिथे बहुतांश नागरिक विना मास्क असल्याचे तसेच कुणीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसल्याचे चाैकशीत आढळून आले. शिवाय, जिल्हा प्रशासनाने सामाजिक कार्यात ५० पेक्षा अधिक नागरिकांना परवानगी नाकारली असताना त्या रिसाॅर्टमधील लाॅनमध्ये त्यापेक्षा अधिक नागरिक असल्याचे पाेलिसांना आढळून आले. त्यामुळे खापा पाेलिसांनी रिसाॅर्टचे मालक व व्यवस्थापक या दाेघांविरुद्ध भादंवि १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलमान्वये गुन्हा नाेंदविला. या घटनेचा तपास ठाणेदार अजय मानकर करीत आहेत.