बस आॅपरेटरवर गुन्हा दाखल करणार
By Admin | Updated: July 11, 2015 02:57 IST2015-07-11T02:57:58+5:302015-07-11T02:57:58+5:30
शहरातील स्टार प्रवासी वाहतूक व पोषण आहार टॅक्स वसुलीतून नियमित आवक होत आहे.

बस आॅपरेटरवर गुन्हा दाखल करणार
कर थकबाकी : वंश निमय इन्फ्राप्रोजेक्टला नोटीस
नागपूर : शहरातील स्टार प्रवासी वाहतूक व पोषण आहार टॅक्स वसुलीतून नियमित आवक होत आहे. असे असतानाही परिवहन विभागाचा ७.९३ कोटीचा कर थकीत आहे. याचा तीन दिवसात भरणा केला नाही तर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा मनपा प्रशासनाने शुक्रवारी बस आॅपरेटर वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट कं पनीला बजावलेल्या नोटीसमधून दिला आहे.
शहरातील स्टार बस वाहतुकीचा प्रवासी कर मागील काही वर्षापासून भरलेला नाही. ही जबाबदारी बस आॅपरेटरची आहे. आॅपरेटरने २००७ साली परिवहन कार्यालयाकडे २५ लाखाचा कर भरला होता. त्यानंतर २००८ साली कराचा भरणा केला नाही. लेखा परीक्षणात यावर आक्षेप नोंदविण्यात आले. याची दखल घेत परिवहन आयुक्त सोनिया शेट्टी यांनी नागपूर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाला पत्र पाठवून मनपाकडून कर वसूल करण्याचे निर्देश दिले. सोमवार १३ जुलैपर्यत कर जमा करण्यासाठी मनपाला मुदत देण्यात आली आहे. गुरुवारी मनपाला हे पत्र मिळाले. शुक्र वारी प्रशासनाने वंश नियम यांना नोटीस बजावून कर न भरल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.(प्रतिनिधी)