नागपूर मनपाची महाराजबाग रस्त्याची फाईल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 22:23 IST2018-01-11T22:20:50+5:302018-01-11T22:23:08+5:30

महापालिकेतील गचाळ कारभाराचा पुरावा गुरुवारी स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्यासमक्षच मिळाला. महाराजबाग येथील डीपी रोडच्या कामाची फाईलच महापालिकेतून गहाळ झाल्याचे दिसून आले.

File of Maharajganj road from Nagpur Municipal Corporation disappeared | नागपूर मनपाची महाराजबाग रस्त्याची फाईल गायब

नागपूर मनपाची महाराजबाग रस्त्याची फाईल गायब

ठळक मुद्देगचाळ कारभाराचा पुरावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील गचाळ कारभाराचा पुरावा गुरुवारी स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्यासमक्षच मिळाला. महाराजबाग येथील डीपी रोडच्या कामाची फाईलच महापालिकेतून गहाळ झाल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांनी एकमेकांना विचारणा करूनही शेवटपर्यंत फाईल सापडली नाही. महाराजबाग रस्त्याचे काम दीड वर्षे सुरू राहिले. ४.७४कोटींचे काम ५.५० कोटींवर गेले, मात्र या रस्त्यावरील पूल बराच अरुंद आहे. या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यासाठी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत ३ कोटी ७६ लाख रुपयांची तरतूद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. रस्त्याच्या कामाला मंजुरी देतानाच पुलाच्या कामाचा समावेश का करण्यात आला नाही, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता संदीप जाधव यांनी याबाबत अधीक्षक अभियंता सतीश नेरळ यांना विचारणा केली. संबंधित फाईल आणण्यास सांगितले, मात्र नेरळ यांच्याकडे ही फाईल नव्हती. नेरळ यांनी धंतोली झोनचे उपअभियंता मनोज सिंग यांना मोबाईलकरून विचारणा केली, मात्र त्यांनाही माहीत नव्हते. हा सर्व प्रकार संदीप जाधव पाहत होते. या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: File of Maharajganj road from Nagpur Municipal Corporation disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.