भंडाऱ्यातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:08 IST2021-02-11T04:08:26+5:302021-02-11T04:08:26+5:30
नागपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडात ११ निरागस बालकांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे या अग्निकांडातील दोषींवर ...

भंडाऱ्यातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
नागपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडात ११ निरागस बालकांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे या अग्निकांडातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनमंच या सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. शासनाने घटनेनंतर १४ दिवसांनी ७ जणांवर प्रशासकीय कारवाई केली होती. ११ बालकांचा मृत्यू होणे ही गभीर बाब आहे. ही घटना खासगी आस्थापनात घडली असती तर शासनाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असता. परंतु भंडारा येथील घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे त्वरित सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडितांना योग्य तो न्याय मिळवून देण्याची मागणी जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप, मनोहर रडके, महासचिव जावळकर, खरासने, राम आखरे, राजेश लोखंडे, टी. बी. राठोड, श्रीधर उगले यांनी केली आहे.
.........