उधारीच्या रकमेवरून हाणामारी, दाेघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:09 IST2021-01-22T04:09:09+5:302021-01-22T04:09:09+5:30
बाजारगाव : उधारीची रक्क्म मागितल्याने दाेघांमध्ये निर्माण झालेला वाद विकाेपास गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात दाेघे जखमी ...

उधारीच्या रकमेवरून हाणामारी, दाेघे जखमी
बाजारगाव : उधारीची रक्क्म मागितल्याने दाेघांमध्ये निर्माण झालेला वाद विकाेपास गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात दाेघे जखमी झाले. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारगाव येथे बुधवारी (दि. २०) रात्री सात वाजताच्या सुमारास घडली.
साहिल कमलेश यादव (वय २५) व जय कांद्रीकर (२३) अशी जखमींची, तर सुनील तराड (५५), सागर सुनील तराड (२३) व सतीश तराड (२०) अशी आराेपींची नावे आहेत. हे सर्वजण बाजारगाव, ता. नागपूर (ग्रामीण) येथील रहिवासी आहेत. साहिलचे वडील कमलेश यादव (५५) यांचे बाजारगाव येथे बिल्डिंग मटेरियलचे दुकान आहे. सुनील, सागर व सतीश बुधवारी रात्री त्यांच्या दुकानात आले आणि त्यांना ३० हजार रुपये उधार का दिले नाही, अशी विचारणा करू लागले. हा वाद विकाेपास गेल्याने या तिघांसह त्यांच्या साथीदारांनी कमलेश, साहिल व जय यांना लाथाबुक्क्या व काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यात साहिल व जयच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना नागपूर शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अदखलपात्र गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.