शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-कोंबडीवरून विधानसभेत रंगला वाद; भुजबळ आणि मनिषा चौधरी आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:35 IST

मुंबईला कोंबडी म्हणणं हा मुंबईकरांचा अपमान म्हणत सभागृहात गोंधळ; कामकाज तहकूब

नागपूर : मुंबई महापालिकेच्या विकासासंदर्भात बोलत असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुंबई ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे, असा वाक्प्रचार केला. त्यावर दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी यांनी मुंबईला कोंबडी का म्हटलं, म्हणत यावर आक्षेप घेतला. त्यावर भुजबळ यांनी ''ऐ खाली बस!'' असं तीनदा म्हटलं, असा आरोप त्यांनी केला. एक ज्येष्ठ नेते व माजी महापौर असलेल्या व्यक्तीने महिला सदस्याला असं संबोधने हे निषेधार्ह आहे. हा समस्त महिलांचा अपमान आहे अशी भावना मनिषा चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान भुजबळ यांनी हा वाक्प्रचार मराठी साहित्यात वापरला जातो, यात कुठलेही असंसदीय शब्द नाहीत. यावरून महिलांचा अपमान झाल्याचंही काही कारण नाही, असे त्यांनी सभागृहाच्या बाहेर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. व महिला सदस्यांचा या वक्तव्यावरून अपमान झाला असेल तर मी दिलगिरीही व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात आव्हाड म्हणाले, हा प्रकार म्हणजे अनावश्यक वाद निर्माण करून सभागृह बंद पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

कोंबडी-मुंबई आणि गोंधळ

छगन भुजबळ यांनी मुंबईसंदर्भात बोलताना केलेल्या विधानावरून वातावरण तापले. मुंबईला कोंबडी म्हणणं हा मुंबईकरांचा अपमान आहे. ज्या शहराने तुम्हाला वेगळी ओळख मिळवून दिली त्या शहराबद्दल तुम्ही असे कसे बोलता. तसेच, हा एकट्या मनीषा चौधरी यांचा अपमान नाही, तर सर्व महिलांचा अपमान आहे. भुजबळ यांनी मुंबईबाबत वापरलेला शब्द मागे घ्यावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने लावून धरली. त्या गोंधळात अजित पवार यांनी मुंबई ही सर्वांची आहे. मुंबईबाबत कोणीही असे वक्तव्य करू शकत नाही, असे सांगितले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनChhagan Bhujbalछगन भुजबळManisha Chaudharyमनीषा चौधरीMumbaiमुंबई