शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धरमपेठेतील पबमध्ये राडा, डोक्यावर बिअरची बॉटल फोडत दोन मित्रांना मारहाण

By योगेश पांडे | Updated: April 23, 2024 16:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धरमपेठ परिसरातील पायरेट्स पबमध्ये चार तरुणांनी राडा करत पार्टी करायला आलेल्या दुसऱ्या गटातील दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धरमपेठ परिसरातील पायरेट्स पबमध्ये चार तरुणांनी राडा करत पार्टी करायला आलेल्या दुसऱ्या गटातील दोन मित्रांना बेदम मारहाण केली. आरोपींनी त्यांच्या डोक्यावर बिअरची बॉटल फोडत हल्ला केला. केवळ धक्का लागला या शुल्लक कारणावरून हा राडा घडला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून परत एकदा नागपुरातील पबमध्ये गुंडागर्दी वाढत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

वेस्ट हायकोर्ट रोडवर पायरेट्स पब आहे. तेथे सोमवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मिर्झा अस्लान फहीम बेग (२३, महाल) हा ओम कथले व त्याच्या दोन मित्रांसोबत पबमध्ये पार्टी करत होता. त्यांच्या शेजारी बॉबी उर्फ प्रशांत धोटे (३६, ओमनगर), पियुष उर्फ ऋषीकेश वाघमारे (२४, रेशीमबाग), रॉकी जाधव (३५) व श्रेयांश शाहू (२२, जुनी शुक्रवारी) हेदेखील पार्टी करत होते. रॉकीचा अस्लानला धक्का लागला. धक्का का मारला असे अस्लानने विचारले असता रॉकी संतापला व त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने अस्लानच्या डोक्यावर बिअरची बाटलीच मारली. यामुळे त्याच्या डोळ्याजवळ जखम झाली. ओम कथले अस्लानला वाचवायला धावला असता पियुष व श्रेयांश यांनी त्याला मारहाण केली. तर बॉबीने तेथील बसण्याची खुर्ची अस्लानच्या पाठीत मारली. रॉकीने परत बिअरची बॉटल अस्लानच्या खांद्यावर मारली. यात अस्लान गंभीर जखमी झाला. त्यानंतर चौघांनीही अस्लानला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी फरार झाले. पबमधून कुणीतरी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन अस्लानला मेयो इस्पितळात उपचारासाठी नेले. त्याच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पबमधील गैरप्रकारांवर कधी नियंत्रण येणार ?मागील काही कालावधीपासून लेटनाईट चालणाऱ्या पब्जमधील गैरप्रकारांमुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पब्जमध्ये अनेकदा राडे झाले असून ठोस कारवाई होत नसल्याने नियमांना धाब्यावर बसवले जात आहे. पबमधून बाहेर निघालेले तरुण त्यानंतर शहरातील विविध भागात तमाशे करतात. विशेषत: धरमपेठ, शिवाजीनगर, अंबाझरी, सदर, ऑरेंज स्ट्रीट या भागात पब्जबाबत नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी