शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

मराठी शाळा संवर्धनास सामान्य कार्यकर्त्यांचा लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 06:31 IST

नागपूरमधील बंद शाळा सुरू करण्याची धडपड : तरीही शासन-प्रशासन उदासीन

निशांत वानखेडे नागपूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा महापालिकेंतर्गत चालणाऱ्या बहुतेक मराठीशाळांना व्यवस्थेची घरघर लागली आहे. अशावेळी अखिल भारतीय दुर्बल समाज संसाधन या संस्थेचे कार्यकर्ते नागपुरात मनपाच्या मराठीशाळा वाचाव्यात, यासाठी धडपडत आहेत. या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन ३०० पालकांना मराठी शाळेत प्रवेश घेण्यासाठी राजी केले. मात्र, शासकीय व प्रशासकीय उदासीनता येथेही अडथळा ठरू पाहत आहे.

संस्थेचे सचिव धीरज भिसीकर हे संघटनेतील मराठी शाळांसाठी धडपड्या कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी. संस्थेने १९९८ पासूनच मराठी शाळा संवर्धनाचा लढा सुरू केला आहे. नागपूरच्या बंगाली पंजा भागातील मराठी शाळेच्या परिसरात व्यावसायिक संकुल उभारण्याच्या निर्णयाविरोधात आवाज उठविला. मात्र, मनपा प्रशासनाने संकुलाचा शाळेवर परिणाम होणार नाही, असा दावा केला होता. आज संकुल तर आहे, शाळा मात्र बंद पडली आहे.गेल्या वर्षी नागपूर महापालिकेने पटसंख्या कमी असण्याच्या कारणाने ३४ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा उच्च न्यायालयात या संस्थेने धाव घेतली. कार्यकर्त्यांनी शहरात वस्त्यावस्त्यांतील शाळांचे सर्वेक्षण करून अहवाल न्यायालयात सादर केला. संस्थेने ४ हजारच्या वर लोकांच्या स्वाक्षºया आधार कार्डसह न्यायालयात सादर केल्या. मात्र प्रशासनाने या स्वाक्षºयाही खोट्या ठरविल्याचे भिसीकर यांनी सांगितले. याचिकेत आयुक्तांसह मुख्यमंत्री, राज्याचे शिक्षण सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनाही प्रतिवादी केले. मात्र महापालिका वगळता कुणीही न्यायालयात उत्तर सादर केले नाही. धक्कादायक म्हणजे या वर्षी बंद पडणाºया शाळांची संख्या ४५ वर गेली आहे. धीरज भिसीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाने ८ फेब्रुवारी रोजी निर्णय देत बंद मराठी शाळा सुरू करण्यास पायलट प्रोजेक्ट राबविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाºयांसह बंद पडलेल्या काही शाळांचे सर्वेक्षण केले. त्यातील जागनाथ बुधवारी, गरोबा मैदान व टिमकी येथील शाळेची पायलट प्रोजेक्टसाठी मनपाने निवड केली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी १०० च्या आसपास मुले प्रवेशासाठी तयार केली. मात्र मनपा प्रशासनाने दोन शाळा ऐनवेळी रद्द करून, दुसºया शाळांची निवड केली. त्यामुळेही पालक निराश झाले. दुसरीकडे शाळा सुरू होण्यास १०-१२ दिवस शिल्लक असताना, या शाळांची अवस्था विदारक असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :marathiमराठीSchoolशाळाnagpurनागपूर