शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण

By नरेश डोंगरे | Updated: May 26, 2025 05:21 IST

सुभेदारगंज ट्रेन मध्ये गोंधळ : रेल्वे पोलिसांकडून तिघांना अटक

नरेश डोंगरे

नागपूर : रेल्वे प्रवासात एका चिमुकल्याने बर्थवर सू-सू केल्याच्या कारणामुळे संतप्त झालेल्या तिघांनी त्या चिमुकल्याच्या आईवडील आणि मामाला बेदम मारहाण केली. सुभेदारगंज मेलमध्ये ही गोंधळ निर्माण करणारी घटना घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात राहणारे अन्सार अहमद चांद अली (वय २०) त्याची बहिण, जावयांसह सुभेदारगंज स्पेशल एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये बसून हैदराबादकडे निघाले होते. अन्सारची बहिण तिच्या चिमुकल्या मुलासह वरच्या बर्थवर बसून होती. शुक्रवारी दुपारी ही गाडी मध्य प्रदेशातील बैतूल-आमला स्थानकाजवळ आली असताना अन्सारच्या भाच्याने सू-सू केली. त्यामुळे खाली बसलेल्या आरोपी राकेश निशाद ललपुराम (वय २५) याचे कपडे ओले झाले. परिणामी चिडलेल्या राकेश आणि त्याच्या साथीदाराने अन्सार तसेच त्याच्या परिवारातील सदस्यांना शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर आता पुढे जे रेल्वे स्टेशन येईल, त्या स्टेशनवर उतरून दुसऱ्या कोचमध्ये बसण्याचे फर्माण सोडले. अन्सार आणि त्याच्या नातेवाईकांनी नकार दिल्यामुळे राकेशने दुसऱ्या कोचमध्ये बसलेल्या आपल्या दोन साथीदारांना फोन करून त्या कोचमध्ये बोलवून घेतले. त्यानंतर त्या तिघांनी अन्सारला बेदम मारहाण केली. त्याची बहिण आणि जावई समजावण्यााठी पुढे आले असता त्यांनाही अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. एका आरोपीने पॅन्टचा बेल्ट काढून अन्सारला जोरदार मारहाण केली. बेल्टचे बक्कल डोक्याला लागल्याने अन्सार रक्तबंबाळ झाला. त्याच्या बहिणीच्या हातालाही दुखापत झाली. या घटनेमुळे ट्रेनमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, अन्सारच्या जावयाने रेल्वे हेल्पलाईनवर फोन करून तक्रार नोंदवली. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांच्या पथकाने ही गाडी नागपूर स्थानकावर येताच जनरल कोच गाठून जखमींना खाली उतरवून घेतले. अन्सारी आणि त्याच्या बहिणीवर उपचार करून त्यांची तक्रार लिहून घेतल्यानंतर आरोपी राकेश ललपुराम, कृष्णकांत गंधालाल (वय २३) आणि रंगबहादूर सूरमई (वय २६, रा. तिघेही सुलमई धखारा, प्रयागराज) या तिघांना पोलिस निरीक्षक पंजाबराव डोये यांनी अटक केली.

प्रकरण आमला पोलिसांकडे

या घटनेची सुरूवात आमला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत झाल्याने नागपूर रेल्वे पोलिसांनी झिरो क्राईमी करून शनिवारी प्रकरण तसेच आरोपींना आमला पोलिसांच्या हवाली केले. पुढील तपास आमला पोलीस करीत असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरIndian Railwayभारतीय रेल्वेCrime Newsगुन्हेगारी