पाचवीपासून सेमी इंग्लिश

By Admin | Updated: August 17, 2014 00:47 IST2014-08-17T00:47:25+5:302014-08-17T00:47:25+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी पुढील वर्षी पाचवीसाठी ‘सेमी इंग्लिश पॅटर्न’ लागू केला जाणार आहे. शनिवारी शिक्षण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

From fifth to cm English | पाचवीपासून सेमी इंग्लिश

पाचवीपासून सेमी इंग्लिश

जि. प. शिक्षण समितीचा निर्णय : गळती रोखण्याचा प्रयत्न
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी पुढील वर्षी पाचवीसाठी ‘सेमी इंग्लिश पॅटर्न’ लागू केला जाणार आहे. शनिवारी शिक्षण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दरवर्षी कमी होत असलेल्या पटसंख्येला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागामार्फत विविध उपक्र म राबविले जात आहेत. परंतु पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वाढला असून जि.प.शाळांत ही सुविधा नाही. याचा पटसंख्येवर परिणाम होत आहे. मागील काही वर्षात सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्यात आले. परंतु अशा मोजक्याच शाळा आहे. त्यामुळे जि.प.शाळांच्या तुलनेत खासगी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
जि.प.च्या १५८२ शाळा आहेत. यात उच्च माध्यमिक शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या निर्णयामुळे पटसंख्या वाढीला मदत होईल, अशी अपेक्षा आहे. जि.प.च्या हिंदी माध्यमांच्या काही शाळांवर मराठी डीएड शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. याचा शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे हिंदी माध्यमांच्या शाळांवर हिंदी डीएड शिक्षकांच्याच नियुक्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण सभापती वंदना पाल यांनी दिली. कामठी-महालगाव महामार्ग जि.प.शाळा परिसरातून गेला आहे. या महामार्गाचे रुंदीकरण करताना शाळा बांधकाम करण्याची ग्वाही देण्यात आली होती. परंतु शाळेचे बांधकाम अर्धवट आहे. या संदर्भात चौकशी करून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सदस्य शिवकुमार यादव, पुष्पा देशभ्रतार, शोभा झाडे, शांता कुमरे, सुधाकर ढोणे, गोपाल खंडाते, शिक्षणाधिकारी ललित रामटेके यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: From fifth to cm English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.