शहरं
Join us  
Trending Stories
1
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
2
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
3
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
4
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
5
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
6
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
7
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
8
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
9
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
10
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
11
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
12
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
13
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
14
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
15
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
16
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
17
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
18
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
19
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
20
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले

नागपूर महोत्सवात बहारदार कार्यक्रमांची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 02:58 IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नागपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फे ब्रुवारी ते २ मार्च दरम्यान यशवंत स्टेडियम येथे नागपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

नामवंत कलावंतांचे सादरीकरण : २८ फे ब्रुवारी ते २ मार्च दरम्यान आयोजननागपूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नागपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फे ब्रुवारी ते २ मार्च दरम्यान यशवंत स्टेडियम येथे नागपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दररोज सायंकाळी ५.३० ते १० या वेळेत विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कलाकार सादरीकरण करणार असल्याने हा महोत्सवात नागपूरकरांसाठी बहारदार कार्यक्रमांची मेजवानी ठरणार आहे. लोकमत समुहाने या महोत्सवाचे संयोजन केले आहे, अशी माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली. या वेळी आमदार अनिल सोेले, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, महोत्सवाचे आयोजक संदीप जोशी, स्थापत्य व विद्युत प्रकल्प समितीचे सभापती सुनील अग्रवाल, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते. महापौर दटके म्हणाले, नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी पार पाडण्यासोबतच शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी या महोत्स्वाचे आयोजन केले आहे. २८ला सायंकाळी ५.३० ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. तसेच लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, अजय संचेती, अविनाश पांडे, कृपाल तुमाने यांची प्रमुख उपस्थिती राहील. विशेष अतिथी म्हणून आमदार नागो गाणार, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव वल्सा आर नायर सिंह, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानोटिया यांच्यासह गटनेते राजू नागूलवार, राजू लोखंडे, राहुल तेलंग, श्रावण खापेकर, किशोर कुमेरिया, गौतम पाटील, असलम खान, हरीश दिकोंडवार,धंतोली झोनच्या सभापती लता यादव उपस्थित राहतील.