मरियमनगर येथे राजेंद्र मुळक यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

By Admin | Updated: July 11, 2014 01:21 IST2014-07-11T01:21:14+5:302014-07-11T01:21:14+5:30

मरियमनगर सिव्हील लाईन्स येथे राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते १० वी १२ वीच्या परीक्षेत यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Felicitations on the hands of Rajendra Mulak at Mariamnagar | मरियमनगर येथे राजेंद्र मुळक यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

मरियमनगर येथे राजेंद्र मुळक यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

नागपूर : मरियमनगर सिव्हील लाईन्स येथे राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते १० वी १२ वीच्या परीक्षेत यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
मुळक यांनी प्रथम माता मरियमला पुष्पहार अर्पण केला. सीताबर्डी चर्चचे पुल्ली पुरोहित पॅट्रीक लेमोस अध्यक्षस्थानी होते. नगरसेविका प्रगती पाटील, नगरसेवक देवा उसरे, माजी नगरसेवक किशोर जिचकार, कुसुमताई घाटे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष घनश्याम मांगे, संजय किनखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मुळक पालकांना उद्देशून म्हणाले, आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण द्या. काही अडचण आल्यास आपण सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. आपल्या आईवडिलांचा नेहमी आदर करा, असे आवाहनसुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना केले. युजीन जोसेफ यांनी संचालन केले. बबलू पिलेल यांनी आभार मानले. मोनिका जोसेफ, माग्रेट पिल्ले, नीळकंठ पिल्ले, मायकल रॉक जॉन, कुशन सिल्वेराज, कॅनेडी अंतोनी, भुरू खान, रोहित कुजुर, राकेश पीटर, प्रमिला जॉन, भुरु बलराज, राजू प्रझोटे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)

Web Title: Felicitations on the hands of Rajendra Mulak at Mariamnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.