कृषिदिनी शेतकऱ्यांचा सत्कार
By Admin | Updated: July 2, 2014 00:57 IST2014-07-02T00:57:53+5:302014-07-02T00:57:53+5:30
वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषद, कृषी विभाग, पंचायत समिती व आत्मातर्फे आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित कृ षिदिन कार्यक्र मात मंगळवारी तालुकास्तरावरील उत्कृ ष्ट शेतकरी,

कृषिदिनी शेतकऱ्यांचा सत्कार
जिल्हा परिषद : वसंतराव नाईक यांची जयंती
नागपूर : वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषद, कृषी विभाग, पंचायत समिती व आत्मातर्फे आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित कृ षिदिन कार्यक्र मात मंगळवारी तालुकास्तरावरील उत्कृ ष्ट शेतकरी, शेतकरी बचत गट व शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जि.प.च्या कृषी विभागामार्फ त पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावर पुरवठा करण्यात येणाऱ्या आॅईल इंजिन,मोटारपंप, एचडीपीई, स्प्रेपंप तसेच सोयाबीन बियाण्यास बीज प्रक्रि या करण्यासाठी कार्बनडॅझीम बुरशीनाशक ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना वाटपासाठी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.
नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांनी हिंमत न सोडता तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या व कृषी विभागाने प्रचार व प्रसार के लेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी पीक घ्यावे, असे आवाहन जि.प.अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी केले. विपरीत परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वसंतराव नाईक यांनी गतकाळात केलेल्या उपाययोजनांचा उल्लेख अतिरक्ति मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन. उबाळे यांनी आपल्या भाषणातून केला. कमी पावसाच्या मूलस्थानी जलसंधारण करण्यासाठी उताराला आडवी पेरणी, रुंद सरी वरंभा पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी शेतकऱ्यांना दिला. तसेच सूक्ष्म सिंचन, सिमेंट नाला बांध, शेततलावातील गाळाचा उपसा आदी बाबींची माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती न करता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन पंचायत समितीचे सभापती अजय बोढारे यांनी केले. कार्यक्र माला सभापती वंदना पाल, दुर्गावती सरियाम, प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शुभांगी कामडी यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी तर आभार कृषी विकास अधिकारी सुबोध मोहरील यांनी मानले. कार्यक्र माला जिल्ह्यातील गुणवंत शेतकरी, कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)