न्यायमूर्ती तहलियानी यांचा सत्कार
By Admin | Updated: August 6, 2015 02:43 IST2015-08-06T02:43:01+5:302015-08-06T02:43:01+5:30
दहशतवादी अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावणारे न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांचा बुधवारी हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरतर्फे ...

न्यायमूर्ती तहलियानी यांचा सत्कार
निरोप समारंभ : हायकोर्ट बार असोसिएशन आयोजक
नागपूर : दहशतवादी अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावणारे न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांचा बुधवारी हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरतर्फे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
न्यायमूर्ती तहलियानी यांची राज्याच्या लोकायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांची बुधवारी शेवटची बैठक होती. यामुळे हायकोर्ट बार असोसिएशनने निरोप समारंभ आयोजित केला होता. दरम्यान, वरिष्ठ वकील अविनाश गोरडे यांच्या हस्ते तहलियानी यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना तहलियानी यांनी नागपूरकराचे प्रेम व परिश्रमाची तयारी या गुणांचे कौतुक केले.
शहरात नेहमीच शांततापूर्ण वातावरण रहात असल्याचे सांगितले. याप्रसंगी बोलताना ते भावूक झाले होते.कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष अॅड. अरुण पाटील, राज्याचे सहयोगी अधिवक्ता रोहित देव, सरकारी वकील भारती डांगरे, वरिष्ठ वकील एस. के. मिश्रा, अनिल मार्डीकर, आनंद जयस्वाल आदी उपस्थित होते. संघटनेचे सचिव अॅड. श्रद्धानंद भुतडा यांनी न्यायमूर्ती तहलियानी यांचा परिचय दिला.
अॅड. राधिका जयस्वाल यांनी संचालन केले तर, अॅड. पंकज नवलानी यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)