शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

भुकेल्या, तहानलेल्या पक्ष्यांसाठी दाणापाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:59 AM

प्राणी व विशेषत: पक्ष्यांना थेंबभर पाण्यासाठी दूरवर वणवण भटकावे लागते. त्यांचा हा संघर्ष कमी व्हावा, हा उद्देश घेऊन ‘ग्रीन अ‍ॅण्ड क्लीन फाऊंडेशन’चे असंख्य हात पुढे सरसावले आहेत.

ठळक मुद्देग्रीन अ‍ॅण्ड क्लीन फाऊंडेशनचे झटणारे हात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हात कधी बाहेर पडल्यावर अचानक तहान लागली की कुणाचाही जीव कासावीस होतो. अशा वेळी कुठे पाणी मिळाले की आत्मा शांत झाल्याचा अनुभव येतो. माणसाप्रमाणे प्राणी व पक्ष्यांची पण हीच अवस्था असते. सूर्य डोक्यावर आग ओकत असताना पक्षी व प्राण्यांना अन्न पाण्यासाठी फिरावे लागते. आपल्याला तहान लागली की कुठून पण ग्लासभर थंड पाणी मिळू शकते, पण प्राणी व विशेषत: पक्ष्यांना थेंबभर पाण्यासाठी दूरवर वणवण भटकावे लागते. त्यांचा हा संघर्ष कमी व्हावा, हा उद्देश घेऊन ‘ग्रीन अ‍ॅण्ड क्लीन फाऊंडेशन’चे असंख्य हात पुढे सरसावले आहेत.या पक्ष्यांसाठी संस्थेने ‘दानापानी’चा उपक्रम सुरू केला आहे. विविध उद्यानात पात्रामध्ये दानापानी टाकण्यासाठी ग्रीन अ‍ॅण्ड क्लीनचे काही सदस्य व तेथे व्यायाम करणारे नागरिक यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. हा उपक्रम महाराजबाग, दगडी पार्क रामदासपेठ व शंकरनगर बगीचा या ठिकाणी केले आहे. संस्थेचे संस्थापक संदीप मानकर व सदस्य पंकज त्रिवेदी व नीलेश गड्डमवार आणि पूर्ण सदस्य यांच्या पुढाकाराने उन्हाळा लागताच हा उपक्रम सुरू केला आहे. या तिन्ही बागेत ९० दानापानी पात्र लावण्यात आले व नागरिकांना आवाहन करण्यात आले की, या पात्रात व आपल्या घराच्या परिसरात शक्य होईल तेव्हा पाणी टाकावे. दानापानी हा उपक्रम राबविणाऱ्या टीममध्ये जयेश बेडेकर, दिनेश करमचंदानी, रोहित ठाकूर, जगदीश पराते, अनिकेत टाकरखेडे, नीलेश चौधरी, राजेश श्रीखंडेवार, विनोद पौनिकर, स्नेहल बागडे, रोहित जालान, अनुराग नेवारे, करुण जैतवार, हृषिकेश चक्रदेव, सचिन पुनियानी, कल्याणी तेलंग, सरिता राजूरकर, रचना त्रिवेदी, सुरेश गंधेवार, प्रशांत त्रिवेदी, दीपाली मुन्शी, संजय थोरी, रोहित दुबे, किशोर पालीवाल, मनोज करवतकर, अनिल श्रीवास्तव, ओमप्रकाश कापगते, अजय इंगोले, राजीव झंवर, महेश बावणे, श्रीष्ट चौरसिया, रंजन टकले, ज्योत्स्ना कुरेकर, प्रतिभा वैरागडे, गोविंद वैराळे, रब्जोटसिंह बसीन, साहिल मेश्राम, शिवकुमार शाहू, रामभाऊ मंगरोलीय, गोपाल शेंदरे, संकेत शंभरकर, सचिन पुनयानी, रमेश ठाकूर, भूषण टोंगे, केतन ब्राम्हणकर, सचिन उरकुडे, रूपेश भोयर, चारुदत्त बेडेकर, डॉ. विलास अतकरे, नंदकिशोर उईके, विजय बोरा, विलास गायकवाड, धर्मा गायकवाड, प्रणय राऊत, सुब्रोतो चॅटर्जी यांचा सहभाग आहे.

टॅग्स :Waterपाणी