नागरिकांकडून फिडबॅक
By Admin | Updated: June 17, 2016 03:11 IST2016-06-17T03:11:22+5:302016-06-17T03:11:22+5:30
बैठकीत अवैध प्रवेशद्वारे बंद करण्यासाठी एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नागरिकांकडून फिडबॅक
२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे ‘वॉच’
नागपूर : बैठकीत अवैध प्रवेशद्वारे बंद करण्यासाठी एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन सदस्यीय समितीने प्रवेशद्वारे बंद करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांपासून फिडबॅक घेऊन हे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वार आणि काही मोजक्या ठिकाणावरून प्रवासी ये-जा करू शकतील. अवैध व्हेंडरची धरपकड करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली असून, गुरुवारी विभागातील रेल्वे स्थानक आणि रेल्वेगाड्यात ४६ अवैध व्हेंडरला पकडल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला सहायक सुरक्षा आयुक्त संजय चौधरी, आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आधुनिक मशीनने वाहनांची तपासणी
रेल्वे सुरक्षा दलाचे कमांडंट सतीजा यांनी सांगितले की, नागपूर रेल्वेस्थानकावर ये-जा करणाऱ्या चारचाकी वाहनांच्या तपासणीसाठी ‘अंडर व्हिकल स्कॅनिंग सिस्टिम’ची स्थापना करण्यात येणार आहे. त्याबाबतची मशीन पुण्यावरून मागविण्यात येईल. या मशीनवरून वाहन गेल्यानंतर त्याबाबतची सर्व माहिती संगणकाच्या स्क्रिनवर पाहता येईल. धर्मकाट्यावर वाहनांची जशी तपासणी होते तशी तपासणी रेल्वेस्थानकावर वाहनांची होणार आहे. यामुळे अप्रिय घटना टाळणे सहज शक्य होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.