शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगे फॅक्टर अन् बीडची निवडणूक; विजयाचा गुलाल उधळताच बजरंग सोनवणे स्पष्टच बोलले!
2
ती पक्षासाठी आणि NDAसाठी लढली; आईच्या पराभवानंतर पार्थ पवार यांची भावनिक पोस्ट!
3
गतविजेत्या इंग्लंडला धक्का! युरोपियन संघाविरुद्ध T20 World Cup मध्ये विजयाची पाटी कोरीच
4
अखेर बीडमध्ये 'तुतारी' वाजली; बजरंग सोनवणे यांचा निसटता विजय, मुंडे बहीण-भावास धक्का
5
महाराष्ट्रात काँग्रेसचा डंका! 'हात'चे गमावलेले 'हे' सहा गड पुन्हा मिळवले
6
"अमोलची माफी मागितली, पण ४८ मतांनी जिंकलो ही..."; निसटत्या विजयानंतर वायकरांची प्रतिक्रिया
7
कर्णधाराने कॅच सोडली, नेपाळने मॅच गमावली! नेदरलँड्सचा रोमहर्षक विजय, मॅक्स ओ'डोडचा तडाखा
8
"…म्हणून इंडिया आघाडीने सरकार स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे’’, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण  
9
Rohit एकटा भिडला, वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पराक्रम केला; नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा वर्चस्मा 
10
“आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
11
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार; समोर आली NDA सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख...
12
"मस्तवाल सत्ताधाऱ्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिलं’’ उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
13
बीडमध्ये तुतारी वाजणार की कमळ फुलणार? पंकजा मुंडे यांचा री-काऊंटींगचा अर्ज  
14
Lok Sabha Election Result 2024 : "...अन् आम्हाला आत्मविश्वास मिळाला", म्हस्केंनी विजयानंतर सांगितलं 'राज'कारण
15
Lok Sabha Election Result 2024 : "वाटाघाटी करणार नाही..," चिराग पासवान यांची मोठी घोषणा; PM मोदींबाबतही मोठं वक्तव्य
16
Mumbai North West Lok Sabha Election Result 2024: खत्तरनाक! फक्त ४८ मतांनी विजय; रवींद्र वायकर आधी हरले, फेरमोजणीनंतर जिंकले
17
"देशातील जनतेचा विश्वास फक्त नरेंद्र मोदींवर", निकालानंतर अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया
18
"भविष्यात हे चित्र बदलण्याची..."; लोकसभा निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
भाजपाचे बहुमत हुकले, एनडीएला सत्ता; नरेंद्र मोदींनी मानले देशवासीयांचे आभार, पुढील सरकारबाबत म्हणाले...
20
ममता बॅनर्जींचं मोठं विधान! भाजपाला PM पदासाठी सुचवला चेहरा; कोण आहे 'तो' नेता?

नागपुरात गरिबीला कंटाळून तरुणाने मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 9:11 PM

आई आणि बहिणीचा आधार असलेल्या एका तरुणाने आर्थिक कोंडी आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. पुरुषोत्तम रामराव भेंडे (वय २०) असे मृताचे नाव आहे. त्याने मृत्यूला कवटाळून स्वत:ची सुटका करून घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आई आणि बहिणीचा आधार असलेल्या एका तरुणाने आर्थिक कोंडी आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या केली. पुरुषोत्तम रामराव भेंडे (वय २०) असे मृताचे नाव आहे. त्याने मृत्यूला कवटाळून स्वत:ची सुटका करून घेतली. त्याच्या आत्मघाती कृत्याने त्याची आई आणि छोट्या बहिणीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पाचपावलीतील बांगलादेश परिसरात भेंडे किराणा दुकानाजवळ पुरुषोत्तम राहत होता. त्याला एक छोटी बहीण आणि आई आहे.पितृछत्र केव्हाच हरविल्यामुळे पुरुषोत्तमच घरातील कर्ता माणूस होता. वृद्ध आई आणि बहिणीचा तो एकमात्र आधार होता. मिळेल ती मोलमजुरी करून हे तिघे दिवस ढकलत होते. लॉकडाऊनमुळे घरोघरचे काम बंद झाले. त्यामुळे हे तिघे अत्यंत हलाखीचे जीवन जगत होते. रोजगार मिळत नसल्यामुळे आणि हातात पैसा नसल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. तो त्याची आई आणि बहीण रोज काम शोधत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी पुरुषोत्तमची आई आणि बहीण कुठे काम मिळते का, ते बघण्यासाठी घराबाहेर गेल्या. तेवढ्या वेळात गरिबीला कंटाळलेल्या पुरुषोत्तमने शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास गळफास लावून घेतला. आई आणि बहीण दुपारी ४ च्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांना पुरुषोत्तम गळफास लावून दिसल्यामुळे त्यांनी एकच आक्रोश केला. आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाले. त्यांनी पाचपावली पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पुरुषोत्तमचा मृतदेह खाली उतरवून मेयो रुग्णालयात पाठवला. पंचनामा वगैरे केल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुरुषोत्तमच्या रूपातील आधार गेल्यामुळे त्याच्या आई आणि बहिणीला जबर मानसिक धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सामाजिक संस्थांनी या निराधार मायलेकीला आधार द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर