शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

निर्भयपणे मतदान करा : पोलीस आयुक्त उपाध्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:32 IST

कुणाच्याही आमिष अथवा दडपणाला बळी पडू नका. निर्भयपणे मतदान करा. गरज पडल्यास पोलिसांसोबत संपर्क करा, आम्ही तुमच्या तात्काळ मदतीला येऊ, असे आश्वासन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले आहे.

ठळक मुद्देआमिष किंवा दडपणाला बळी पडू नकाअनुचित प्रकाराची माहिती द्या : पोलीस तात्काळ मदतीला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुणाच्याही आमिष अथवा दडपणाला बळी पडू नका. निर्भयपणे मतदान करा. गरज पडल्यास पोलिसांसोबत संपर्क करा, आम्ही तुमच्या तात्काळ मदतीला येऊ, असे आश्वासन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला ते लोकमतशी बोलताना म्हणाले की, निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. शहरात सर्वत्र अभूतपूर्व बंदोबस्त लावण्यात आला आहे. स्थानिक पोलीस आणि होमगार्डस्च्या मदतीला केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेण्यात आले आहे. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातील लढतीवर देशाचे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीला कसल्याही अनुचित प्रकाराने गालबोट लागू नये म्हणून पोलीस यंत्रणा रात्रंदिवस परिश्रम घेत आहे. शहरातील सर्व संवेदशनशील वस्त्यात आणि झोपडपट्ट्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. संवेदनशील, अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रांवर सशस्त्र सुरक्षा व्यवस्था नेमण्यात आली आहे. मतदानाच्या एक आठवड्यापूर्वीपासूनच पोलिसांनी शहरातील गुंडांना हाकलून लावण्यासाठी प्रतिबंधक कारवाई, तडिपारी, एमपीडीएसारखी कारवाई केली आहे. अवैध दारू विक्री करणारे आणि धूमधाम करणारे उपद्रवी समाजकंटक यांच्यावरही पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू ठेवली आहे. विनाकारण वाद घालून शांतता भंग करण्याची सवय जडलेल्या गुन्हेगारांवरही पोलिसांची खास नजर आहे. मात्र, अशाही स्थितीत कुणी मतदारांना आमिष किंवा धाक दाखवून मतदान प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न करू शकतात. मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे कुणी दडपण आणण्याचा प्रयत्न केल्यास कुणालाही न घाबरता पोलीस नियंत्रण कक्षात थेट संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. पोलीस तात्काळ तेथे पोहोचून योग्य ती उपाययोजना करेल. कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आश्वासनही पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी दिले आहे.

तात्काळ पोहोचणार क्यूआरटी  

शहरातील कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अवघ्या ५ ते ७ मिनिटात शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ आणि एसआरपीएफची कंपनी तात्काळ धाव घेईल आणि स्थिती निर्माण करणाऱ्यावर कडक कारवाई करेल. गुरुवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत सीपी (पोलीस आयुक्त) ते पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) असे सर्वच बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019